फॉर्च्युनर आता विकून टाका! एकदा टँक फुल केलं की 1226 किमी कुठेही फिरा, येतेय धाकड SUV
- Published by:Sachin S
Last Updated:
दमदार फिचर्स आणि उत्तम रेंज मिळत असल्यामुळे ईव्ही गाड्या खरेदीकडे लोकांचा कल वाढला आहे. अशातच आता भारतात लवकरच 1226 किमी रेंज देणारी एसयूव्ही लाँच होण्याची शक्यता आहे. भारतात आतापर्यंत सगळ्यात जास्त रेंज देणारी एसयूव्ही ठरणार आहे.
भारतात सध्या जीएसटीच्या दरात कपात झाल्यामुळे दर महिन्याला नवी नवीन एसयूव्ही लाँच होत आहे. कमी किंमती कार आणि एसयूव्ही आता मार्केटमध्ये उपलब्ध झाल्या आहेत. तर दुसरीकडे ईव्ही गाड्यांचा दबदबा वाढत चालला आहे. दमदार फिचर्स आणि उत्तम रेंज मिळत असल्यामुळे ईव्ही गाड्याा खरेदीकडे लोकांचा कल वाढला आहे. अशातच आता भारतात लवकरच 1226 किमी रेंज देणारी एसयूव्ही लाँच होण्याची शक्यता आहे. भारतात आतापर्यंत सगळ्यात जास्त रेंज देणारी एसयूव्ही ठरणार आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
ROX 1 नेमकी आहे कशी? - Rox 01 ही एक लांब आणि मोठी अशी एसयूव्ही आहे. फॉर्च्युनर, महिंद्रा स्कॉर्पिओ N च्या कॅटेगरीमधील ही एसयूव्ही असणारा आहे. या Rox 01 मध्ये 21-इंचाचे अलॉय व्हिल्स दिले जाणार आहे. भारतात येणाऱ्या Rox 01 मध्ये लिंडार नावाची सिस्टिम असणार आहे. हे फिचर ADAS लेव्हल २ साठी काम करतंय.
advertisement
advertisement
केबिनमध्ये प्रायव्हेट जेटसारखी जागा Rox 01 ही एक लक्झरी एसयूव्ही असणार आहे. त्यामुळे Rox 01 च्या केबिनमध्ये तुम्हाला एखाद्या प्रायव्हेट जेटसारखा फिल येईल. यामध्ये ६ आणि ७ सीटर असा पर्याय दिला जाणारआहे. ६ सीटरमध्ये लक्झरी लाऊंज सीट दिले जाणार आहे. यामध्ये मसाज, हिटिंग आणि व्हेंटिलेशनसह पाय ठेवण्यासाठी सपोर्ट दिला जाईल. डॅशबोर्डवर 15.7-इंचाची 3K हाय-रिझ्याल्युशन टचस्क्रीन असणार आहे. या गाडीमध्ये तब्बल १४ स्पीकर्स दिले जाणार आहे.
advertisement






