प्रभू शेळकेला आठ वर्षांपासून गंभीर आजार, 'काळू डॉन'च्या उपचारासाठी वडिलांनी विकलंय वावर, नेमकं झालंय काय
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Prabhu Shelke :'बिग बॉस मराठी 6'च्या घरात पहिल्याच दिवशी काळू डॉन अर्थात प्रभू शेळकेने आपल्या गंभीर आजाराबाबत भाष्य केलं आहे. वयाच्या आठव्या वर्षापासून तो गंभीर आजाराशी झुंज देत आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
'बिग बॉस मराठी 6'च्या पहिल्या एपिसोडमध्ये विशाल कोटियनच्या बोलण्याने काळू डॉन दुखावला गेला. विशाल काळू डॉनला उचलून घेत म्हणाला होता,"घरात डंबल कमी पडले तर हा आहे". यामुळे दुखावलेला काळू डॉन वॉशरुममध्ये जातो आणि देवीआईला प्रार्थना करत म्हणतो,"माझी देवीआई प्लीज मला साथ दे. मला माहिती आहे तू माझ्या पाठीशी राहणार आहेस. तू माझी माय आहेस. दर महिन्याला रक्त बदलावं लागतं. हा आजार बरा करण्यासाठी मी इथे आलो आहे". प्रभू शेळके आजही पत्र्याच्या घरात राहतो.








