Suniel Shetty: 'पैशांसाठी काहीही करू?' सुनील शेट्टीने एका झटक्यात नाकारली 40 कोटींची ऑफर, कारण काय?

Last Updated:
Suniel Shetty : अलीकडेच सुनील शेट्टीने त्याच्या आयुष्यातील एका अशा निर्णयाचा खुलासा केला आहे, ज्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
1/10
मुंबई: बॉलिवूडमध्ये 'अण्णा' या नावाने प्रसिद्ध असलेला अभिनेता सुनील शेट्टी फक्त त्याच्या भारदस्त आवाजासाठी किंवा फिटनेससाठी ओळखला जात नाही, तर तो आपल्या तत्त्वांशी कधीही तडजोड न करणारा माणूस म्हणूनही ओळखला जातो.

advertisement
2/10
अलीकडेच सुनील शेट्टीने त्याच्या आयुष्यातील एका अशा निर्णयाचा खुलासा केला आहे, ज्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. ४० कोटी रुपयांची मोठी रक्कम डोळ्यासमोर असूनही त्याने एका जाहिरातीला चक्क लाथ मारली.

3/10
पण त्याने असं का केलं? यामागे फक्त एकच कारण होतं, ते म्हणजे आपल्या मुलांप्रती असलेली जबाबदारी आणि वडिलांच्या आठवणी.

4/10
आजकाल अनेक मोठे स्टार्स पान मसाला किंवा तंबाखूशी संबंधित उत्पादनांच्या जाहिरातींमध्ये दिसतात. पण सुनील शेट्टी याला अपवाद ठरला. एका मुलाखतीत त्याने सांगितलं की, त्याला एका तंबाखू उत्पादनाच्या जाहिरातीसाठी ४० कोटी रुपयांची ऑफर आली होती.

5/10
सुनील म्हणाला,
सुनील म्हणाला, "मी त्या ऑफरकडे पाहिलं आणि विचार केला, पैशांसाठी मी हे करेन का? माझं उत्तर होतं 'नाही'. कदाचित मला त्या पैशांची गरजही असेल, पण माझ्या मुलांवर, अथिया आणि अहानवर कुठलाही डाग लागेल असं काम मी कधीच करणार नाही. मला त्यांच्यासमोर एक चांगला आदर्श ठेवायचा आहे." सुनीलच्या या निर्णयाने चाहत्यांची मनं जिंकली आहेत.
advertisement
6/10
सुनील शेट्टीच्या आयुष्यात २०१४ ते २०१७ हा काळ अत्यंत कठीण होता. त्याचे वडील वीरप्पा शेट्टी २०१४ पासून गंभीर आजारी होते. आपल्या वडिलांची सेवा करण्यासाठी सुनीलने त्याच्या करिअरला पूर्णविराम दिला आणि अभिनयापासून लांब राहण्याचा निर्णय घेतला.

7/10
तो म्हणतो,
तो म्हणतो, "वडिलांच्या निधनापूर्वीचे ते तीन वर्ष मी फक्त त्यांच्यासोबत होतो. माझी मानसिक स्थिती तेव्हा काम करण्यासारखी नव्हती." २०१७ मध्ये वडिलांच्या निधनानंतर सुनील पूर्णपणे कोलमडला होता. पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं.
advertisement
8/10
ज्या दिवशी वडिलांचं निधन झालं, त्याच दिवशी सकाळी त्याला एका 'हेल्थ शो'साठी विचारणा झाली. सुनीलने याला आपल्या वडिलांनी दिलेला संकेत मानलं आणि पुन्हा काम करायचं ठरवलं.

9/10
सुमारे ७ वर्षांच्या ब्रेकनंतर जेव्हा सुनीलने कमबॅक केलं, तेव्हा त्याला थोडा संकोच वाटत होता. इंडस्ट्री बदलली होती, नवीन चेहरे आले होते. पण महामारीच्या काळात त्याने स्वतःला एका वेगळ्या साच्यात घडवलं.

10/10
वाचन, कडक ट्रेनिंग आणि स्वतःवरचा विश्वास यामुळे सुनील आज वयाच्या ६० व्या वर्षीही विशीतल्या तरुणांना लाजवेल असा दिसतो. आज सुनील शेट्टी साऊथच्या मोठ्या चित्रपटांमध्ये आणि वेब सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसत आहे.

Shiv Sena Candidate List BMC Election: बीएमसी निवडणुकीत एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक! ६० उमेदवार तयार, तिकीट कुणाला?
बीएमसी निवडणुकीत एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक! ६० उमेदवार तयार, तिकीट कुणाला?
  • भाजपसोबत जागा वाटपाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना मोठा निर्णय घ

  • शिंदे यांनी आपल्या ६० उमेदवारांना तयार राहण्याचे आदेश दिले आहेत.

  • एकनाथ शिंदे यांनी आपली ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे.

View All
advertisement