13 वर्षांचा संसार मोडून बोनी कपूरनी केलं दुसरं लग्न; नवऱ्याच्या अफेअरबद्दल समजताच पहिल्या बायकोची झाली अशी अवस्था
- Published by:Nishigandha Kshirsagar
Last Updated:
आज बोनी कपूर त्यांचा 68 वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांच्या आणि श्रीदेवीच्या नात्याची नेहमीच चर्चा झाली. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची प्रेमकहाणी कशी सुरू झाली. याचदरम्यान त्यांचं त्यांची पहिली पत्नी मोनासोबत नेमकं नातं कसं होतं हे देखील जाणून घेऊया.
advertisement
advertisement
बोनी कपूर यांच्या पहिल्या पत्नीचे नाव मोना कपूर असून ती आता या जगात नाही. श्रीदेवीला पडद्यावर पाहिल्यानंतर बोनी कपूर पहिल्याच नजरेत तिच्या प्रेमात पडले. पण एक काळ असा होता जेव्हा मोना कपूरची श्रीदेवीशी घट्ट मैत्री होती. दोघांमध्ये इतकं प्रेम होतं की मोनाने श्रीदेवीला स्वतःच्या घरात राहण्यासाठी जागा दिली होती. त्या दिवसांत श्रीदेवी मिथुन चक्रवर्तीला डेट करत होती.
advertisement
advertisement
बोनी कपूर यांना श्रीदेवीला 'मिस्टर इंडिया'मध्ये कास्ट करायचे होते. पण त्याच्यापर्यंत अभिनेत्रीपर्यंत पोहोचण्याचा कोणताही मार्ग नव्हता. अशा परिस्थितीत त्यांनी श्रीदेवीच्या आईशी संपर्क साधला. श्रीदेवीच्या आईने आणखी पैशांची मागणी केली, पण बोनीने होकार दिला. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान बोनीने श्रीदेवीला आपल्या मनाची गोष्ट सांगितली आणि हळूहळू दोघांची जवळीक वाढू लागली.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
DNA ला दिलेल्या थ्रोबॅक मुलाखतीत, मोना शौरी कपूरने या कठीण काळाबद्दल खुलासा केला होता. ती म्हणाली होती, “हा अपमान वेदनादायक होता कारण मला एका सुपरस्टार नायिकेच्या तुलनेत उभे केले गेले होते. मला कमीपणा वाटू लागला होता. त्यानंतर अनेकांनी मला ‘तुम्ही वजन का कमी करत नाही?’ किंवा ‘तुम्ही स्पा का जॉईन करत नाही?’ अशा सूचना दिल्या. हीच ती वेळ होती जेव्हा तिला जाणवले की तिला स्वतःसाठी एक स्थान निर्माण करण्याची गरज आहे.








