advertisement

Iran US : इराणमध्ये थरारक कारवाई, कोसळलेल्या F-15E फायटर जेटच्या पायलटची सुटका, पण..., अमेरिकेने दिली मोठी अपडेट

Last Updated:

Iran US Conflict: इराणने अमेरिकेचे लढाऊ विमाने पाडले असल्याची माहिती समोर आली.अमेरिका आणि इराणमध्ये तणावाचे वातावरण असताना दुसरीकडे अमेरिकेने इराणमध्ये थरारक कारवाई केली आहे

इराणमध्ये थरारक कारवाई, कोसळलेल्या F-15E फायटर जेटच्या पायलटची सुटका, पण..., अमेरिकेने दिली मोठी अपडेट
इराणमध्ये थरारक कारवाई, कोसळलेल्या F-15E फायटर जेटच्या पायलटची सुटका, पण..., अमेरिकेने दिली मोठी अपडेट
वॉशिंग्टन: अमेरिका-इस्रायलने इराणविरोधात युद्ध पुकारून महिनाभराचा काळ उलटून गेला आहे. दिवसेंदिवस युद्ध आणखी तीव्र होत असल्याचे संकेत दिसू लागले आहेत. इराणकडून अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. इराणने अमेरिकेचे लढाऊ विमाने पाडले असल्याची माहिती समोर आली.अमेरिका आणि इराणमध्ये तणावाचे वातावरण असताना दुसरीकडे अमेरिकेने इराणमध्ये थरारक कारवाई केली आहे. इराणमध्ये कोसळलेल्या फायटर जेटच्या वैमानिकाची सुटका केली आहे.
मध्य-पूर्वेतील युद्धाने आता टोकाचे वळण घेतले असून, इराणमध्ये कोसळलेल्या अमेरिकन F-15E फायटर जेटच्या बेपत्ता वैमानिकाला वाचवण्यात अमेरिकेला यश आले आहे. अत्यंत थरारक आणि भीषण गोळीबाराच्या दरम्यान अमेरिकन विशेष दलाने (Special Forces) हे बचाव अभियान राबवले. खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या मोहिमेच्या यशाची पुष्टी केली आहे.

मृत्यूशी झुंज आणि ६० हजार डॉलर्सचं बक्षीस

advertisement
शुक्रवारी इराणने अमेरिकेचे अत्याधुनिक F-15E विमान पाडल्यानंतर एक वैमानिक सुरक्षित बचावला होता, तर दुसरा बेपत्ता झाला होता. इराणच्या लष्कराने या बेपत्ता वैमानिकाला पकडण्यासाठी ६० हजार डॉलर्सचे (सुमारे ५० लाख रुपये) बक्षीस जाहीर केले होते. इराणचे सैन्य आणि स्थानिक नागरिक या वैमानिकाच्या शोधात असतानाच, अमेरिकेने गुप्तपणे शोधमोहीम सुरू केली होती.

इतिहासातील सर्वात धाडसी बचाव मोहीम

advertisement
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आपल्या 'ट्रुथ सोशल' अकाऊंटवर या मोहिमेच्या यशाची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, "आम्ही त्याला वाचवले आहे! अमेरिकन लष्कराने इतिहासातील सर्वात धाडसी 'सर्च अँड रेस्क्यू' ऑपरेशन यशस्वी केले आहे. आमचे कर्नल आता सुरक्षित आहेत." इस्फहानच्या दक्षिण भागात हा वैमानिक अडकला होता. त्याला बाहेर काढण्यासाठी अमेरिकन सैन्याला इराणच्या लष्करासोबत मोठा संघर्ष करावा लागला असल्याचे त्यांनी सांगितले.
advertisement

मोहीम अजूनही सुरूच

मिळालेल्या माहितीनुसार, वैमानिकाचा शोध लागला असला तरी त्याला इराणच्या सीमेबाहेर सुरक्षित स्थानी नेण्याचे काम अजूनही सुरू आहे. अमेरिकन अधिकारी आणि बचाव दल अजूनही इराणच्या हद्दीतच असल्याने तणाव कायम आहे. इराणने असाही दावा केला आहे की, शोधमोहीम राबवणारे आणखी एक अमेरिकन विमान त्यांनी पाडले आहे.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
Iran US : इराणमध्ये थरारक कारवाई, कोसळलेल्या F-15E फायटर जेटच्या पायलटची सुटका, पण..., अमेरिकेने दिली मोठी अपडेट
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement