Mumbai Crime : एकटी महिला पाहताच सुटायचं कंट्रोल; मुंबईत फिल्म कर्मचाऱ्याचा भयानक प्रताप
Last Updated:
Mumbai News : मुंबईतील बांगूर नगर पोलिसांनी 48 तासांत सिरीयल छेडछाड करणाऱ्या आरोपीला अटक केली. आरोपी महिलांना लक्ष्य करून छेडछाड करत असे. 29 सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी कारवाई केली असून आणखी प्रकरणे उघड होण्याची शक्यता आहे.
प्रतिनिधी.संकेत वरक मुंबई : मुंबई शहरात पुन्हा एकदा महिलांच्या सु्रक्षितेबाबत गंभीर प्रश्न निर्माण करणारी घटना समोर आली आहे. बांगूर नगर पोलिसांनी एका सिरीयल छेडछाड करणाऱ्या आरोपीला अटक केली असून तो उच्चभ्रु भागात एकट्या महिलांना लक्ष करत असल्याचे तपासात समोर आले.
एकटी महिला दिसली की तो 'असं' करायचा
मिळालेल्या माहितीनुसाक, मुख्तार नसीर खान असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो फिल्म इंडस्ट्रीत काम करत असल्याची माहिती पोलिसांनाकडून मिळत आहे. हा आरोपी रात्रीच्या वेळी किंवा कमी गर्दी असलेल्या ठिकाणी एकट्या महिलांना पाहत असे आणि त्यांच्याशी छेडछाड करत. महिलेसोबत गुन्हा केल्यानंतर लगेच बाईकवरुन पळत काढत होता, त्यामुळे त्याला पकडणे एक आव्हानात्मक ठरत होते.
advertisement
पण या प्रकरणात पोलिसांनी वेगवान कारवाई करत अवघ्या 48 तासांतच आरोपीला अटक केली आहे. त्यासाठी तब्बल 29 सीसीटीव्ही फुटेज तपासले गेले. अनेक कॅमेऱ्यांमधून आरोपीच्या हालचालींचा मागोवा घेत अखेर त्याची ओळख पटवण्यात आली आणि त्याला अटक करण्यात पोलिसांनी यश आले.
धक्कादायक गोष्ट म्हणजे आतापर्यंत या आरोपीविरोधात तीन वेगळ्या वेगळ्या छेडछाडीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मात्र पोलिसांच्या मते तपास पुढे गेल्यावर आणखी अशा घटनांची माहिती मिळेल. या घटनांमुळे स्थानिक परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून महिलांनी एकटे जाताना सावध राहण्याचा आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 05, 2026 12:23 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Crime : एकटी महिला पाहताच सुटायचं कंट्रोल; मुंबईत फिल्म कर्मचाऱ्याचा भयानक प्रताप










