advertisement

Shubman Gill : गुजरातचा कॅप्टन शुभमन संपूर्ण IPL मधून आऊट? असिस्टंट कोच पार्थिव पटेलने सांगितली खरी परिस्थिती!

Last Updated:

Parthiv Patel On Shubman Gill injury : गुजरात टायटन्सचा असिस्टंट कोच पार्थिव पटेल याने याविषयी अपडेट दिली आहे. पार्थिव पटेलच्या मते, गिलची ही दुखापत फारशी गंभीर नाही आणि तो लवकरच रिकव्हर होईल.

Parthiv Patel On Shubman Gill injury
Parthiv Patel On Shubman Gill injury
Gujarat Titans Skipper Shubman Gill Injury : आयपीएलच्या 9 व्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात झालेल्या सामन्यात टॉस सुरू झाला अन् गुजरातच्या फॅन्सला मोठा धक्का बसला. कारण कॅप्टन म्हणून राशीद खान मैदानात आला. शुभमन गिलच्या अनुपस्थितीमुळे अनेकांना प्रश्न पडले होते. शुभमन दुखापतग्रस्त असल्याने तो आला नाही, असं राशीद खानने म्हटलं होतं. त्यानंतर आता त्याच्या दुखापतीवर मोठी अपडेट समोर आलीये.\

दुखापत फारशी गंभीर नाही?

गुजरात टायटन्सचा असिस्टंट कोच पार्थिव पटेल याने याविषयी अपडेट दिली आहे. पार्थिव पटेलच्या मते, गिलची ही दुखापत फारशी गंभीर नाही आणि तो लवकरच रिकव्हर होईल. "आम्हाला आशा आहे की तो पुढच्या मॅचसाठी पूर्णपणे फिट असेल. जरी मला इंजरी मॅनेजमेंटबद्दल तांत्रिक माहिती नसली, तरी मी खात्रीने सांगू शकतो की तो लवकरच ठीक होईल," असं पार्थिवनं स्पष्ट केलं आहे. गिल हा टीम इंडियाच्या बॅटिंग लाईनअपमधील महत्त्वाचा दुवा असल्याने त्याच्या फिटनेसकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
advertisement

फिटनेसबाबत शंका उपस्थित

नोव्हेंबर 2025 मध्ये भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टेस्ट मॅच दरम्यान गिलच्या मानेला दुखापत झाली होती. या जुन्या दुखारतीसोबतच काही दिवसांपूर्वी त्याला अचानक स्नायूंच्या आखडण्याचा त्रास जाणवला होता, ज्यामुळे त्याच्या फिटनेसबाबत शंका उपस्थित केली जात होती. आता पुन्हा एकदा थोडा त्रास जाणवल्याने मॅनेजमेंटने त्याला विश्रांती देऊन योग्य खबरदारी घेण्याचं ठरवलं आहे. शुभमन गिल वनडे वर्ल्ड कपमुळे खबरदारी घेतोय.
advertisement

कुमार कुशाग्राला संधी मिळणार?

दरम्यान, पुढील महत्त्वाच्या मॅचेस पाहता गिलचे फिट असणे टीम इंडियासाठी अत्यंत गरजेचे आहे. आगामी सामन्यात शुभमन गिल फिट झाला तर तो मॅचमध्ये खेळेल नाहीतर कुमार कुशाग्रा याला पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. शुभमनच्या अनुपस्थितीत त्याला आपली कला सादर करण्याची संधी मिळू शकते. कुमार कुशाग्रा याला टीम इंडिया नवा सुपरस्टार खेळाडू म्हणून पाहिलं जातंय.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Shubman Gill : गुजरातचा कॅप्टन शुभमन संपूर्ण IPL मधून आऊट? असिस्टंट कोच पार्थिव पटेलने सांगितली खरी परिस्थिती!
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement