advertisement

उन्हाळी सुट्टीत होऊदे दिल्ली दौरा, नांदेड-संभाजीनगरातून थेट ट्रेन, पाहा थांबे अन् वेळापत्रक

Last Updated:

Railway Update: विशेष म्हणजे सचखंड, संपर्क क्रांती आणि नांदेड- फिरोजपूर एक्स्प्रेसनंतर दिल्लीला जाण्यासाठी ही चौथी रेल्वे असणार आहे.

Railway Update: उन्हाळी सुट्टीत होऊदे दिल्ली दौरा, नांदेड-संभाजीनगरातून थेट ट्रेन, पाहा वेळापत्रक
Railway Update: उन्हाळी सुट्टीत होऊदे दिल्ली दौरा, नांदेड-संभाजीनगरातून थेट ट्रेन, पाहा वेळापत्रक
छत्रपती संभाजीनगर: उन्हाळी सुट्टीत अनेकांचा फिरण्याचा प्लॅन असतो. त्यामुळे रेल्वेला गर्दी वाढते. यासाठीच दक्षिण मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. हुजूर साहिब नांदेड ते हजरत निजामुद्दीन (नवी दिल्ली) दरम्यान उन्हाळी विशेष रेल्वे चालवण्यात येणार आहे. ही गाडी संभाजीनगरमार्गे जाणार असल्याने उत्तर भारतात जाणाऱ्यांची सोय होईल.
दक्षिण मध्य रेल्वेने उन्हाळी हंगामातील गर्दीच्या पार्श्वभूमीवर 29 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, यामध्ये छत्रपती संभाजीनगरहून गाडी नसल्याने नाराजी व्यक्त होत होती. आता मराठवाड्यातील प्रवाशांची निकड लक्षात घेऊन नवी गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे सचखंड, संपर्क क्रांती आणि नांदेड- फिरोजपूर एक्स्प्रेसनंतर दिल्लीला जाण्यासाठी ही चौथी रेल्वे असणार आहे.
advertisement
अशी धावणार विशेष रेल्वे
नांदेड ते दिल्ली (क्रमांक 07621) ही साप्ताहिक विशेष रेल्वे 11 एप्रिल ते 30 मे या कालावधीत दर शनिवारी धावेल. ही गाडी नांदेड येथून सकाळी 8.45 वाजता सुटेल. 11 वाजून 40 मिनिटांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये येईल आणि 10 मिनिटांनी पुन्हा प्रस्थान करेल. दुसऱ्या दिवशी दुपारी 2.00 वाजता हजरत निजामुद्दीन येथे पोहोचेल. या गाडीच्या 11, 18, 25 एप्रिल आणि 2, 9, 16, 23 व 30 मे रोजी एकूण 8 फेऱ्या चालवण्यात येतील.
advertisement
दिल्ली ते नांदेड (क्रमांक 07622) ही गाडी परतीच्या प्रवासात 12 एप्रिल ते 31 मे या कालावधीत दर रविवारी धावेल. दिल्ली येथून रात्री 9.40 वाजता सुटेल. तर दुसऱ्या दिवशी रात्री साडेआठ वाजता छ. संभाजीनगर आणि मध्यरात्री 12.35 वाजता नांदेडला पोहोचेल. या गाडीच्या देखील 12, 19, 26 एप्रिल आणि 3, 10, 17, 24 आणि 31 मे रोजी 8 फेऱ्या चालवण्यात येतील.
advertisement
आरक्षण आणि थांबे
या विशेष साप्ताहिक गाडीचे आरक्षण 5 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता सुरू होईल. तसेच ही गाडी दोन्ही दिशांनी प्रवास करताना पूर्णा, परभणी, सेलू, परतूर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, झाशी, ग्वाल्हेर, आग्रा कँट आणि मथुरा या स्थानकांवर थांबेल.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
उन्हाळी सुट्टीत होऊदे दिल्ली दौरा, नांदेड-संभाजीनगरातून थेट ट्रेन, पाहा थांबे अन् वेळापत्रक
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement