छोटा शकीलनं दिली सुपारी अन् हास्यजत्रेतील या अभिनेत्यानं 14 व्या वर्षी वडीलांना गमावलं; झाली नाही शेवटची भेट
- Published by:Nishigandha Kshirsagar
Last Updated:
हास्यजत्रेतून अवघ्या महाराष्ट्राला खळखळून हसवणाऱ्या एका अभिनेत्याची वैयक्तिक कहाणी मात्र खूपच हृदयद्रावक आहे. या अभिनेत्याच्या वडिलांची हत्या झाली होती. त्यानं एका मुलाखतीत याविषयी खुलासा केला होता.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
प्रसादने अभ्यासासह इतरही पुस्तकं वाचावी अशी त्याच्या वडिलांची इच्छा. त्यामुळे त्यांनी त्याचं नाव बोरिवलीच्या ग्रंथालयात टाकलं होतं. मात्र तो तिथून फक्त गोष्टींची पुस्तकं वाचायचा. त्यावर त्याचे वडील रागावले आणि त्याला 'सोनेरी टोळी' हे पुस्तक वाचायला सांगितलं. एके दिवशी प्रसादला ते पुस्तक मिळालं आणि आनंदात तो वडिलांना ते पुस्तक दाखवायला गेला.
advertisement
15 एप्रिल 1999 हा तो दिवस. बाबांना पुस्तक दाखवायचं म्हणून प्रसाद उत्साहात घरी बाबांची वाट पाहत बसला होता. मात्र बाबा कामाला गेलेले. त्यांची दुधाची डेरी देखील होती. ते कामावरून मग डेरीवर जातील म्हणून प्रसाद डेरीवर गेला. डेरीत गेल्यावर त्याला कळलं की बाबा घरी गेलेत, म्हणून तो त्याची सायकल घेऊन घरी गेला. पण घरी गेल्यावर त्याला कळलं की बाबा शाखेत गेलेत. पण तिथेही गेल्यावर त्याच्या पदरी तेव्ह निराशाच आली.
advertisement
advertisement








