advertisement

देवाशी भांडण अन् तिथल्या तिथे मिळाली शिक्षा! नास्तिक असलेल्या रिंकू राजगुरूला केदारनाथमध्ये आला अदृश्य शक्तीचा प्रत्यय

Last Updated:
Rinku Rajguru : रिंकूने केदारनाथच्या प्रवासात तिला आलेल्या अशा एका अनुभवाबद्दल सांगितलं आहे, ज्याने तिचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं.
1/8
मराठी सिनेसृष्टीची लाडकी 'आर्ची' म्हणजेच रिंकू राजगुरू नेहमीच आपले साधे राहणीमान आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. पण सध्या रिंकू एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे.
मराठी सिनेसृष्टीची लाडकी 'आर्ची' म्हणजेच रिंकू राजगुरू नेहमीच आपले साधे राहणीमान आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. पण सध्या रिंकू एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे.
advertisement
2/8
पडद्यावर खंबीर वाटणारी ही अभिनेत्री खऱ्या आयुष्यात एका मोठ्या आध्यात्मिक बदलातून जात आहे.
पडद्यावर खंबीर वाटणारी ही अभिनेत्री खऱ्या आयुष्यात एका मोठ्या आध्यात्मिक बदलातून जात आहे. "मी आधी नास्तिक होते," अशी कबुली देणाऱ्या रिंकूने केदारनाथच्या प्रवासात तिला आलेल्या अशा एका अनुभवाबद्दल सांगितलं आहे, ज्याने तिचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं.
advertisement
3/8
राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत रिंकूने तिला आलेला प्रत्यय सांगितला. ती म्हणाली,
राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत रिंकूने तिला आलेला प्रत्यय सांगितला. ती म्हणाली, "खरं सांगू तर माझा देवाधर्मावर फारसा विश्वास नव्हता. पण जेव्हा मी केदारनाथला गेले, तिथे अशा काही घटना घडल्या की मला त्या अदृश्य शक्तीची जाणीव झाली."
advertisement
4/8
रिंकूने सांगितलं की, आता ती सकाळी उठल्यावर मनोभावे देवपूजा करते, जप करते. यामागे अंधश्रद्धा नाही, तर सण-उत्सव आणि मंत्रांमागचं वैज्ञानिक कारण तिला पटलं आहे. पण या सगळ्याची सुरुवात झाली ती केदारनाथच्या थरारक अनुभवापासून.

5/8
रिंकूचा केदारनाथचा अनुभव एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखाच नाट्यमय आहे. पौर्णिमेच्या दिवशी रिंकू पायी चालत केदारनाथला पोहोचली. दर्शनानंतर ती प्रचंड थकली होती आणि रडत होती. तिला परतीसाठी हेलिकॉप्टर हवं होतं. कारण दुसऱ्या दिवशी तिची फ्लाइट होती.

6/8
रिंकू पुढे म्हणाली,
रिंकू पुढे म्हणाली, "आम्हाला एक माणूस म्हणाला की हेलिकॉप्टर मिळेल. आम्ही दोन-तीन तास थांबलो. वाट बघून बघून शेवटी अंधार व्हायला लागला आणि मी देवाला म्हणाले की, मला हेलिकॉप्टर मिळूदे. मी माझं कुटुंबासह दर्शनाला येईन." तासनतास वाट पाहूनही जेव्हा हेलिकॉप्टर मिळेना, तेव्हा रिंकूचा संयम सुटला आणि ती चक्क देवावरच ओरडू लागली.
advertisement
7/8
तिने तो प्रसंग सांगताना म्हटलं,
तिने तो प्रसंग सांगताना म्हटलं, "मी रडत होते, चिडले होते. मी देवाला म्हटलं, 'हा काय देव आहे? माझं साधं ऐकत सुद्धा नाही, मला फक्त एक हेलिकॉप्टर हवंय तेही मिळत नाहीये!' मी देवाला असं बोलत पुढे जात होते, इतक्यात मागून एक माणूस आला आणि म्हणाला फक्त दोन सीट शिल्लक आहेत, तुम्हाला यायचं का? मी आनंदाने पळत सुटले आणि त्याच क्षणी जोरात जमिनीवर आपटले. माझ्या गुडघ्याला जबरदस्त लागलं. तेव्हा मला जाणीव झाली की, मी देवावर ओरडले आणि त्याने मला तिथेच शिक्षा दिली. त्यानंतर मी ठरवलं की आयुष्यात पुन्हा कधीच तक्रार करणार नाही."
advertisement
8/8
रिंकू सध्या तिच्या 'पुन्हा एकदा साडे माडे तीन' या सिनेमामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात ती अशोक सराफ, भरत जाधव आणि मकरंद अनासपुरे यांसारख्या दिग्गजांसोबत स्क्रीन शेअर करत आहे. कामाच्या व्यापातही रिंकू आता आपल्या मनाची शांतता जपण्यासाठी जप आणि पूजेचा आधार घेतेय.

उद्या नक्की काय होणार कोणालाच कल्पना नाही, बाजारात सर्वजण टेन्शनमध्ये; दलाल स्ट्रीटवर 'ब्लॅक मंडे'चे सावट, पुढचे 5 दिवसांचे महासंकट
उद्या नक्की काय होणार कोणालाच कल्पना नाही, बाजारात सर्वजण टेन्शनमध्ये
  • काहीतरी मोठं अघटित घडणार

  • उद्यापासून शेअर बाजारात 5 दिवसांचे 'महा-संकट'

  • नक्की काय घडणार?

View All
advertisement