बॉलिवूडमध्ये फ्लॉप होताच अभिनेत्रीनं पाकिस्तानात जाऊन थाटला संसार; पण 2 वेळा मोडलं लग्न

Last Updated:
अनेक पाकिस्तानी कलाकारांनी हिंदी चित्रपटांमध्ये नशीब आजमावलं आणि भारतीय चाहत्यांनी देखील त्यांच्यावर खूप प्रेम केलं. 80 च्या दशकात देखील एका पाकिस्तानी अभिनेत्रीनं भारतीय सिनेसृष्टीत नशीब अजमावलं होतं. ती पहिल्याच बॉलिवूड चित्रपटातुन रातोरात स्टार बनली.
1/8
सलमा आगाने 1982 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'निकाह' या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. या चित्रपटात अभिनेत्री राज बब्बर आणि दीपक पराशर यांच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसली होती. तिच्या पहिल्या चित्रपटाच्या यशाने सलमा रातोरात लोकप्रिय झाली. त्यानंतर सलमाकडे अनेक चित्रपटांच्या ऑफर्सची रांग लागली होती.

advertisement
2/8
'निकाह'च्या रिलीजवेळी सलमा अवघ्या 17 वर्षांची होती. इतक्या लहान वयात तिने आपल्या पहिल्याच चित्रपटातून इंडस्ट्रीत यश मिळवलं. पण सलमा आगा हे यश टिकवू शकली नाही.  वैयक्तिक आयुष्यामुळे सलमाची कारकीर्द उद्ध्वस्त झाली.

3/8
 सलमा आगाला खरंतर अभिनेत्री व्हायचं नव्हतं. ती योगायोगाने चित्रपटात आली. तिला गायिका व्हायचं होतं पण नशिबाने तिला अभिनेत्री बनवलं. सलमा गाण्याच्या संदर्भात नौशाद साहब यांच्या घरी पोहोचली होती, जिथे तिची भेट चित्रपट निर्माते बीआर चोप्रा यांच्याशी झाली.

4/8
बीआर चोप्रा यांना सलमा आगा आवाज आणि शैलीमुळे  पहिल्याच नजरेत आवडली, त्यानंतर त्यांनी अभिनेत्रीला चित्रपटाची ऑफर दिली. ती बीआर चोप्राच्या चित्रपटाला नकार देऊ शकली नाही आणि लगेचच तिने या चित्रपटासाठी होकार दिला. सलमा आगाने 'पति पत्नी और तवैफ', 'उंचे लोग', 'जंगल की बेटी' यांसारख्या अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये उत्कृष्ट अभिनय करत स्वतःची ओळख निर्माण केली.

5/8
अभिनेत्रीच्या आयुष्यात एक-दोनदा नव्हे तर अनेक वेळा प्रेमाची एंट्री झाली. पण लग्न होऊनही सलमाला खरं प्रेम मिळालं नाही. सलमा आगाला तिच्या आयुष्यात दोनदा घटस्फोटाचा त्रास सहन करावा लागला आहे आणि मीडिया रिपोर्ट्सनुसार तिचे तिसऱ्या पतीसोबतचे संबंधही फारसे चांगले नाहीत.

6/8
सलमा त्या काळात तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत राहिली होती. या अभिनेत्रीचं नाव सगळ्यात आधी न्यूयॉर्कचे बिझनेसमन महमूद सिप्रा यांच्याशी जोडलं गेलं, ज्यामुळे तिने आपलं करिअर पण पणाला लावलं होतं. पण तिचं हे नातंही अयशस्वी ठरलं आणि ती चित्रपटांमध्येही फ्लॉप झाली.

7/8
प्रसिद्ध पाकिस्तानी चित्रपट दिग्दर्शक जावेद शेख यांनी सलमाच्या आयुष्यात पुन्हा प्रवेश केला, त्यानंतर अभिनेत्री पुन्हा एकदा पाकिस्तानला गेली. तिने पाकिस्तानात काम करायला सुरुवात केली आणि दिग्दर्शकाशी लग्नगाठ बांधली. पण त्यांचं पहिलं लग्न सहा वर्षांतच तुटलं. यानंतर सलमाने 1989 मध्ये स्क्वॅशपटू रहमत खानसोबत लग्न केलं. 2010 मध्ये तिचं हे लग्नही मोडलं. या लग्नातुन तिला एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

8/8
दुस-या घटस्फोटानंतर वयाच्या 57 व्या वर्षी सलमा आगाने दुबईस्थित बिझनेसमन मंझर शाह यांच्याशी तिसरे लग्न केले, पण मीडिया रिपोर्ट्सनुसार ती आता तिसऱ्या पतीपासूनही वेगळी राहते. तिने पाकिस्तानात काम करायला सुरुवात केली, पण तिला स्वतःच्या देशातही यश मिळालं नाही.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement