advertisement

Shocking Crime : वाद पत्नीचा, बळी आईचा! रागाच्या भरात मुलाने विसरलं आईचं प्रेम; बदलापुरातील संतापजनक प्रकार

Last Updated:

Badlapur Shocking Crime : आई अन् मुलांच नातं कायम खास मानलं जातं. आपल्या लेकासाठी आई काहीही करण्यास तयार असते. मात्र बदलापूरातील प्रकार पाहून सर्वजण हादरले आहे. जिथे आपल्याच आईसोबत मुलांने धक्कादायक प्रकार केलेला आहे.

News18
News18
बदलापूर : बदलापूरमध्ये आई-मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मुलानेच आपल्या आईवर जीव घेण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली असून याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
असं घडलं तरी काय?
मिळालेल्या माहितीनुसार, नंदा व्यापारी या आपल्या नातवासोबत घराच्या हॉलमध्ये झोपल्या होत्या. त्यावेळी त्यांचा मुलगा मिलिंद हा त्यांच्याजवळ आला. त्याच्या पत्नीशी झालेल्या संभाषणाचे मोबाईलमधील रेकॉर्डिंग कोणी डिलीट केले, या कारणावरून त्याने आईला झोपेतून उठवून वाद घालायला सुरुवात केली.
वाद वाढल्यानंतर मुलाचा संताप अनावर
वाद वाढत गेल्यानंतर मिलिंदने आईला शिवीगाळ करत त्यांच्या तोंडावर चापट्या मारल्या. त्यानंतर कपाटातील बनियनचा बोळा करून तो त्यांच्या तोंडात कोंबला. एवढ्यावरच न थांबता त्याने एका हाताने गळा आवळत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.
advertisement
या घटनेनंतर आरोपी मिलिंद हा घटनास्थळावरून फरार झाला होता. दरम्यान उल्हासनगर गुन्हे शाखेतील पोलिस शिपाई रामदास उगले यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. सध्या या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
Shocking Crime : वाद पत्नीचा, बळी आईचा! रागाच्या भरात मुलाने विसरलं आईचं प्रेम; बदलापुरातील संतापजनक प्रकार
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement