'वेलकम टू द जंगल'च्या आधीच Welcome 4 ची चर्चा, स्क्रिप्ट तयार; स्टारकास्ट कोण असणार?
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
'वेलकम टू द जंगल' अद्याप बॉक्स ऑफिसवर रिलीज झालेला नाही तोच, सध्या 'वेलकम 4' चित्रपटाची जोरदार चर्चा होत आहे. 'वेलकम 4' ची स्क्रिप्ट ठरली असल्याची माहिती समोर आली असून सध्या चाहत्यांमध्ये चर्चा सुरू आहे ती, चित्रपटाच्या कलाकारांची. 'वेलकम 4'च्या कामाला केव्हापासून सुरूवात होणार आहे, जाणून घेऊया...
advertisement
निर्माते फिरोज नाडियाडवालाने 'वेलकम टू द जंगल' रिलीज होण्याच्या आधीच चित्रपटाच्या चौथ्या भागाची तयारी सुरू केली आहे. मिडिया रिपोर्टनुसार, चित्रपटाच्या चौथ्या भागात अनिल कपूर आणि नाना पाटेकर यांची घरवापसी होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे प्रेक्षकांना 'वेलकम'मधली सर्व स्टारकास्ट पुन्हा एकदा पाहायला मिळेल, हे नक्की.
advertisement
'वेलकम 4'मध्ये अनिल कपूर मजनू भाईच्या भूमिकेत, नाना पाटेकर उदय शेट्टीच्या भूमिकेत, परेश रावल डॉ. घुंगरूच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. यांच्यासोबत अक्षय कुमार सुद्धा दिसणार आहे. सध्या 'वेलकम 4'च्या स्क्रिप्टचं सुरू असून लवकरच ते पूर्ण होईल. मल्टीस्टारकास्ट असलेल्या या चित्रपटामध्ये बॉलिवूडमधले अनेक कलाकार दिसणार आहेत.
advertisement
'मिड- डे'ने दिलेल्या वृत्तानुसार, 'वेलकम टू द जंगल' पेक्षा 'वेलकम 4' पूर्णपणे वेगळी असणार आहे. ज्यामध्ये, नाना पाटेकर, अनिल कपूर, परेश रावल हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. परेश रावल यांची 'वेलकम टू द जंगल' मध्ये भूमिकेत असून डॉक्टरच्या भूमिकेत दिसणार नाहीत. चाहत्यांमध्ये परेश रावल नेमकी कोणती भूमिका साकारणार? यामध्ये जोरदार चर्चा आहे.
advertisement
'वेलकम' आणि 'वेलकम बॅक' या दोन्हीही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर 100 कोटींहून अधिकचा गल्ला कमावला होता. बजेटपेक्षा सर्वाधिक कमाई करत चित्रपटाने सर्वांचेच लक्ष वेधले होते. आता प्रेक्षकांना आतुरता आहे ती, 'वेलकम टू द जंगल' ची. या चित्रपटामध्ये बॉलिवूडमधले अनेक कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सध्या चाहत्यांमध्ये चित्रपटाची चांगलीच चर्चा होत आहे.
advertisement
अहमद खान दिग्दर्शित, 'वेलकम टू द जंगल' चित्रपट येत्या जून 2026 मध्ये रिलीज होणार आहे. चित्रपटामध्ये, अक्षय कुमार, परेश रावल, जॅकी श्रॉफ, रविना टंडन, दिशा पाटनी, लारा दत्ता, जॅकलिन फर्नांडिस, अरशद वारसी, तुषार कपूर, श्रेयस तळपदे, जॉनी लिव्हर, राजपाल यादव, शारिब हाश्मी, इनामुलहक, मुकेश तिवारी, यशपाल शर्मा, कृष्णा अभिषेक, कीकू शारदा, मिका सिंह, दलेर मेहंदी आणि फरीदा जलाल सारखी तगडी स्टारकास्ट चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे.









