नवा लीडर आणि सर्वात मोठा हल्ला, इराणकडून थेट अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर स्ट्राइक
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
कतारमधील 'अल उदेद' एअर बेसवर इराणने हल्ला केल्याने मध्यपूर्वेतील युद्ध धोकादायक वळणावर. इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला खामेनी यांच्या मृत्यूनंतर अमेरिकन सैन्याला टार्गेट केलं.
मध्यपूर्वेतील युद्ध आता निर्णायक आणि अत्यंत धोकादायक वळणावर पोहोचलं आहे. कतारमधील 'अल उदेद' (Al Udeid Air Base) या आखाती देशांतील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या लष्करी तळावर भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला खामेनी यांच्या मृत्यूनंतर पेटलेल्या या संघर्षात, इराणने थेट अमेरिकन सैन्याला टार्गेट केलं आहे. इस्रायलनंतर आता अमेरिकेच्या तळांना टार्गेट केलं जात असल्याने आता वॉशिंग्टन थेट या महायुद्धात ओढलं जाण्याची भीती निर्माण झालीय.
नेमकं काय घडलं?
दोहा इथे 'अल उदेद' एअर बेसवर सोमवारी दुपारी अचानक मोठ्या स्फोटांचे आवाज ऐकू आले आणि संपूर्ण परिसरात सायरनचा मोठा आवाज झाला. प्राथमिक अहवालांनुसार, इराणने ड्रोन किंवा मिसाईल्सच्या साहाय्याने या तळाला थेट लक्ष्य केलं असण्याची शक्यता आहे. या तळावर अमेरिकेचे हजारो सैनिक आणि अत्याधुनिक लढाऊ विमानं तैनात आहेत. जर या हल्ल्यात अमेरिकन सैनिकांची जीवितहानी झाली असेल, तर अमेरिकेचं उत्तर अत्यंत भीषण असू शकतं.
advertisement
खामेनींच्या मृत्यूचा बदला?
गेल्या महिन्यात अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला खामेनी मारले गेले होते. तेव्हापासून इराण 'रक्ताचा बदला रक्ताने' घेण्याची भाषा करत आहे. इराणने याआधीही 'अल उदेद' तळावर छोटेखानी हल्ले केले होते, मात्र आजचा हल्ला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि थेट हल्ला मानला जात आहे.
U.S. servicemembers capture the moment an air defense system failed to intercept an Iranian missile over Al Udeid Air Base in Qatar.
$3,000,000 vs $50,000 pic.twitter.com/DiAky9nueV
— Sentinel Field Report (@TPMLLCUSA) March 9, 2026
advertisement
अमेरिकेचा 'संयम' सुटणार?
अल उदेद हा केवळ एक तळ नाही, तर मध्यपूर्वेतील अमेरिकन वर्चस्वाचा मुख्य कणा आहे. इराणच्या या धाडसाने अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. ट्रम्प यांनी आधीच इराणला 'बिनशर्त शरणागती' पत्करण्यास सांगितलं होतं. आता या हल्ल्यानंतर अमेरिका इराणच्या मुख्य शहरांवर किंवा अणुप्रकल्पांवर थेट हल्ला करणार का? याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे.
advertisement
महायुद्धाचा भडका उडणार?
जर इराण आणि अमेरिका यांच्यात थेट युद्ध सुरू झालं, तर त्याचे परिणाम केवळ आखाती देशांपुरते मर्यादित राहणार नाहीत. यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ होऊन जागतिक अर्थव्यवस्था कोलमडू शकते. आधीच रशिया आणि इस्रायल या युद्धात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सहभागी असताना, आता आखाती देशांत सुरू झालेला हा 'स्फोटांचा मालिका' तिसऱ्या महायुद्धाची नांदी तर नाही ना? अशी चर्चा सुरू झाली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 09, 2026 3:11 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
नवा लीडर आणि सर्वात मोठा हल्ला, इराणकडून थेट अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर स्ट्राइक







