advertisement

Crime : घरातून बाथरुमसाठी बाहेर पडली अन् परतलीच नाही; त्या काळोखात 15 वर्षीय विद्यार्थिनीसोबत घडलं भयंकर

Last Updated:

Bhiwandi Crime : भिवंडीत 15 वर्षीय विद्यार्थिनीच्या संशयास्पद मृत्यूनंतर कुटुंबीय आणि स्थानिक नागरिक संतप्त झाले. मात्र हे कसे घडले आणि ही विद्यार्थींनी घरातून कोणत्या कारणांवरुन बाहेर पडली त्याबाबत सविस्त जाणून घ्या.

News18
News18
भिवंडी : भिवंडी शहरात एका 15 वर्षीय विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात कुटुंबीयांनी मुलीची हत्या झाल्याचा आरोप करत आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे.
घडले तरी काय?
मिळालेल्या माहितीनुसार ,नारपोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारी ही विद्यार्थिनी इयत्ता दहावीत शिक्षण घेत होती. 1 मार्च रोजी ती बाथरूमला जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडली होती. मात्र बराच वेळ उलटूनही ती घरी परतली नाही. रात्री उशिरापर्यंत मुलगी घरी न आल्याने कुटुंबीयांना चिंता वाटू लागली.
यानंतर नातेवाईक आणि कुटुंबीयांनी परिसरात तसेच ओळखीच्या ठिकाणी दिवसभर शोध घेतला. मात्र मुलीचा काहीच पत्ता लागला नाही. अखेर कुटुंबीयांनी रात्री उशिरा नारपोली पोलिस ठाण्यात जाऊन मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.
advertisement
दरम्यान या प्रकरणात मुलीचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे समोर आल्यानंतर कुटुंबीय आणि स्थानिक नागरिक संतप्त झाले. शनिवारी (7 मार्च) रात्री अजमेरनगर ते नारपोली पोलिस ठाण्यापर्यंत कुटुंबीय आणि स्थानिक रहिवाशांनी पायी मोर्चा काढला. या वेळी आरोपींना तात्काळ अटक करून घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. या घटनेमुळे भिवंडी परिसरात मोठी चर्चा सुरू असून पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/ठाणे/
Crime : घरातून बाथरुमसाठी बाहेर पडली अन् परतलीच नाही; त्या काळोखात 15 वर्षीय विद्यार्थिनीसोबत घडलं भयंकर
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement