advertisement

T20 World Cup : इकडं भारताने वर्ल्ड कप जिंकला तिकडं पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप! खेळाडूने तडकाफडकी जाहीर केली निवृत्ती

Last Updated:

Pakistan Cricket After India Left T20 World Cup : टीम इंडियाच्या वर्ल्ड कप विजयानंतर पाकिस्तान क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Pakistan Cricket Amid team india win T20 World Cup
Pakistan Cricket Amid team india win T20 World Cup
Pakistan Cricket Amid team india win T20 World Cup : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कप सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला अन् चॅम्पियन होण्याचा सलग दुसऱ्यांदा मान मिळवला आहे. अशातच टीम इंडियाच्या वर्ल्ड कप विजयानंतर पाकिस्तानमध्ये आग लागल्याचं पहायला मिळतंय. शेजारील देश पाकिस्तानमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पाकिस्तानच्या एका युवा स्टार क्रिकेटरने अवघ्या 24 व्या वर्षी तडकाफडकी क्रिकेटला कायमचा रामराम ठोकला आहे.

क्रिकेट वर्तुळात खळबळ 

क्रिकेटरच्या या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे जागतिक क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (PCB) कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. शहजेब भट्टी असं या खेळाडूचं नाव आहे. शहजेब भट्टी हा गेल्या वर्षी 'कायदे आझम ट्रॉफी' जिंकणाऱ्या टीमचा महत्त्वाचा भाग होता. मात्र, इतकी चांगली कामगिरी करूनही त्याला सतत डावलले गेल्याचा आरोप त्याने केला आहे.
advertisement

सलग 40 मॅचसाठी बेंचवर

सोशल मीडियावर आपली व्यथा मांडताना शहजेबने लिहिलं की, "गेल्या वर्षी मी लाईव्ह टीव्हीवर फायनल जिंकली होती, पण त्यानंतर मला सलग 40 मॅचसाठी बेंचवर बसवून ठेवलं गेलं." या उपेक्षेला कंटाळूनच संन्यास घेण्याचा टोकाचा निर्णय घेतला आहे. शहजेबने पाकिस्तान क्रिकेटमधील राजकारण आणि भ्रष्टाचारावर गंभीर आरोप केले आहेत.
advertisement

पाकिस्तान सोडून चाललोय...

पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करण्याचे आपले स्वप्न सिस्टीममधील त्रुटींमुळे भंग पावलं असल्याचं त्यानं म्हटलं आहे. "राजकारण आणि लचर ढाच्यामुळे माझ्यासारख्या अनेक खेळाडूंचे करिअर उद्ध्वस्त होत आहे, म्हणूनच अनेक खेळाडू आता पाकिस्तान सोडून जात आहेत," असे त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. पीसीबीवरील अशा आरोपांमुळे पाकिस्तान क्रिकेटची प्रतिमा पुन्हा एकदा मलिन झाली आहे.
advertisement

पाकिस्तानच्या गल्लीबोळात टीम इंडियाची चर्चा

दरम्यान, टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर पाकिस्तानमध्ये खालच्या आवाजात कौतुक होताना दिसतंय. तर वरून वरून पाकिस्तानमध्ये सन्नाटा दिसत आहे. पाकिस्तानच्या गल्लीबोळात अभिषेक शर्मा आणि जसप्रीत बुमराहचं कौतुक होत असल्याचं पाकिस्तानी मीडियाच्या रिपोर्टमधून समोर येतंय.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T20 World Cup : इकडं भारताने वर्ल्ड कप जिंकला तिकडं पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप! खेळाडूने तडकाफडकी जाहीर केली निवृत्ती
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement