ऐकावं ते नवलंच! 'या' एका किड्याची किंमत 'इतकी' आहे की, त्यात अलिशान बंगला किंवा गाडी घ्याल!
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
बीटल (भुंगा) हा एक छोटासा किडा. पण त्याची किंमत विचाराल तर तुम्हाला धक्का बसेल. तोही, स्टॅग बीटल! त्या किड्याच्या किमतीत तुम्ही एक लक्झरी कार किंवा...
advertisement
advertisement
स्टॅग बीटल खरं तर ल्युकेनिडी (Lucanidae) कुटुंबाशी संबंधित आहेत, ज्यात 1200 हून अधिक प्रजाती आहेत. स्टॅग बीटल युरोप, आशिया आणि अमेरिकेच्या उष्णकटिबंधीय जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात. ते भारताच्या आसाम, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम आणि पश्चिम घाटांच्या घनदाट जंगलांमध्येही आढळतात. नर स्टॅग बीटलला हरणाच्या शिंगांसारखे दिसणारे मँडिबल्स (जबड्याचे भाग) असतात, म्हणूनच या भुंग्याला हे नाव मिळालं आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
पुनरुत्पादनातील अडचण : हा किडा दुर्मिळ आहे, कारण त्याचं पुनरुत्पादन करणं अत्यंत कठीण आहे. हा स्टॅग बीटल 2-5 वर्षांपर्यंत अळ्यांच्या अवस्थेत (larval stage) जगतो. पण एकदा तो प्रौढ झाल्यावर, तो फक्त काही महिनेच जगू शकतो. प्रयोगशाळेत किंवा नियंत्रित वातावरणात त्याचं प्रजनन करणं खूप महागडं आहे आणि त्यासाठी खूप वेळ लागतो.
advertisement
केवळ दुर्मिळच नाही, तर उपयोगी देखील! स्टॅग बीटल परिसंस्थेत (ecosystem) महत्त्वाची भूमिका बजावतात. ते सडलेल्या लाकडावर जगतात, ज्यामुळे जंगलातील पोषक तत्वं पुन्हा वापरली जातात. चांगली गोष्ट अशी आहे की ते जिवंत झाडांना हानी पोहोचवत नाहीत, त्यामुळे त्यांना पर्यावरणपूरक (eco-friendly) कीटक म्हणता येईल.
advertisement