advertisement

Weather Alert: 6 डिसेंबरला हवामानात मोठे बदल, कल्याण-डोंबिवलीला हवामान विभागाचा अलर्ट

Last Updated:
Weather Alert: ठाण्यासह कल्याण-डोंबिवलीतील हवामानात सातत्याने बदल जाणवत आहेत. 6 डिसेंबरसाठी हवामान विभागाने महत्त्वाचा अलर्ट दिला आहे.
1/5
महाराष्ट्रामधील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. ठाण्यासह कल्याण-डोंबिवली परिसरात देखील तापमानात चढ-उतार जाणवत आहेत. सकाळी गारठा तर दुपारी उकाडा अशी स्थिती असून काही ठिकाणी पारा 10 अंशांपर्यंत घसरला आहे. तर दुपारचे तापमान तिशीपार जात आहे. <a href = 'https://news18marathi.com/tag/weather-forecast/'>आजचं हवामान</a> अपडेट जाणून घेऊ.
आजचं हवामान अपडेट जाणून घेऊ. " width="1500" height="1000" /> महाराष्ट्रामधील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. ठाण्यासह कल्याण-डोंबिवली परिसरात देखील तापमानात चढ-उतार जाणवत आहेत. सकाळी गारठा तर दुपारी उकाडा अशी स्थिती असून काही ठिकाणी पारा 10 अंशांपर्यंत घसरला आहे. तर दुपारचे तापमान तिशीपार जात आहे. आजचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
2/5
कल्याणमध्ये तापमानात अधिक घट दिसून येते आहे. येत्या काही दिवसांत पारा सुमारे 9°C ते 12°C पर्यंत घसरण्याची शक्यता आहे. परंतु, सध्या किमान तापमान 22 ते 25 अंश आणि कमाल तापमान 30 ते 39 अंशांपर्यंत राहील. दिवसभर हवामान, स्वच्छ आणि आल्हाददायक राहील. तसेच आकाश निरभ्र आणि हवामान कोरडे राहणार असून वाऱ्याचा वेग साधारणपणे 20 किमी/तास असेल.

3/5
डोंबिवलीमध्ये हवामान साधारणपणे निरभ्र आणि कोरडे राहण्याचा अंदाज आहे, दिवसा तापमान 30°C च्या आसपास, तर रात्री 22-23°C पर्यंत खाली येऊ शकते, वाऱ्याचा वेग 10 ते 15 किमी/तास असल्याने हवेत धुके असू शकते आणि उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे दिवसभर वातावरण आल्हाददायक आणि किंचित थंड राहील. दिवसभर हलके वारे वाहतील आणि हवामान सुखद राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

4/5
कल्याण-डोंबिवलीच्या ग्रामीण भागात थंडीची लाट जाणवत आहे. दिवसभर कमाल तापमान सुमारे 30-31°C असून रात्री ते तापमान 21-23°C खाली येऊ शकते. दिवसभर हलके वारे वाहतील त्यामुळे ग्रामीण भागात हवामान सुखद, कोरडे आणि निरभ्र राहण्याची शक्यता.

5/5
ठाणे जिल्ह्यातील शहापूर आणि मुरबाड तालुक्यात कमाल तापमान सुमारे 35°C आणि किमान तापमान 14°C च्या आसपास असू शकते. याठिकाणी हवा थंड आणि कोरडी असेल, सकाळ-संध्याकाळ थोडी थंडी जाणवेल. तर बदलापुरात तापमान 20°C पर्यंत खाली येऊ शकते. आज पावसाचा कोणताही इशारा नाही. हवामान कोरडे राहील. पुढील काही दिवस हवामानाची हीच स्थिती कायम राहील. हवामानातील बदलांमुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी.

अजितदादांचा विमान अपघात: हा निव्वळ दुर्दैव की व्यवस्थेने केलेला घात; बारामतीच्या रनवेवर त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अजितदादांचा विमान अपघात: हा निव्वळ दुर्दैव की व्यवस्थेने केलेला घात
  • बारामती अपघात हा शेवटचा इशारा

  • विमान वाहतूक सुरक्षेचे 'ऑडिट' आता तरी होणार का?

  • अजित पवारांचा अंत आणि उडालेली सुरक्षा यंत्रणा

View All
advertisement