Weather Alert: 22 जानेवारीला हवामानात मोठे बदल, कल्याण-डोंबिवलीला पुन्हा अलर्ट
- Reported by:GEETA PANDHARINATH GAIKAR
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather Alert: मुंबईसह ठाण्यातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. कल्याण-डोंबिवलीसह परिसरातील हवामान अपडेट जाणून घेऊ.
जानेवारीच्या उत्तरार्धात महाराष्ट्रातील हवामानात मोठे चढ-उतार होत आहेत. काही भागात थंडी जाणवत असली तरी आता तापमानात वाढ होत आहे. तर काही ठिकाणी हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवली आहे. मुंबईसह ठाण्यात किमान तापमानात वाढ झाली असून सकाळी काहीसा गारठा तर दुपारा उकाडा हैराण करत आहे. कल्याण-डोंबिवलीसह परिसरातील गुरुवारचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
बदलापूरमध्ये गेल्या दोन दिवसांपासून हवामान स्थिर आहे. गुरुवारी किमान तापमान किंचित घट झाली असून10 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस असेल. शहापूर मुरबाड परिसरात हवामान थंड आणि आल्हाददायक राहील. तापमान कमी झाल्याने सकाळी व रात्री थंडी जाणवेल. किमान तापमान 13 अंश सेल्सिअस तर कमाल 35 अंश सेल्सिअस असेल. बदलत्या हवामानामुळे नागरिकांना आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.









