दसऱ्याला दिली जाणारी सोन्याची पानं आरोग्यासाठी खरंच सोन्यासारखी! हे फायदे तुम्ही कधीच ऐकले नसतील

Last Updated:
दसऱ्याच्या दिवशी आपण एकमेकांना आपट्याची पाने सोने म्हणून एकमेकांना देतो. या आपट्याच्या पानांचे आयुर्वेदाच्या दृष्टीने देखील खूप महत्त्व आहे.
1/7
सध्या नवरात्रोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली आहे. नवरात्रीचे 9 दिवस देवीची मनोभावे पूजा केली जाते. यानंतर 10 व्या दिवशी सर्वजण विजयादशमी म्हणजेच दसरा सण साजरा करतात.

advertisement
2/7
दसऱ्याच्या दिवशी आपण एकमेकांना आपट्याची पाने सोने म्हणून एकमेकांना देतो. या आपट्याच्या पानांचे आयुर्वेदाच्या दृष्टीने देखील खूप महत्त्व आहे. त्यामुळे हे महत्त्व नेमके काय आहे, याचा आपल्याला कसा फायदा होतो, याचविषयी आपण जाणून घेऊयात.

3/7
आहारतज्ञ अलका कर्णिक यांनी याबाबतची माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, जर तुमच्या शरीरामध्ये खूप उष्णता असेल, तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये ॲसिडिटीचा त्रास असेल, बद्धकोष्ठतेचा त्रास असेल, तुम्हाला अपचनाच्या समस्या असतील, तर या सर्व आजारांवर तुम्ही आपट्याच्या पानांचे सेवन करू शकता.

4/7
आपट्याची पाने पाण्यात भिजत घालून त्याचा रस जर काढला आणि तो रस सकाळचे जेवण झाल्यावर घेतला तर हे सर्व आजार कमी व्हायला मदत होते.

5/7
नवरात्रीत अनेकजण 9 दिवस उपवास करतात आणि त्यानंतर त्यांना अपचनाचा किंवा ॲसिडिटीचा त्रास होतो. तर या लोकांनी उपवास सोडून सकाळचे जेवण झाल्यानंतरच दोन पानांचा रस जर घेतला तर कोणताही त्रास होणार नाही. तसेच दीर्घकाळ याचा तुम्हाला फायदा होईल.

6/7
हा रस तयार करताना आपट्याची पाने साधारणपणे 2 ते 3 तास पाण्यामध्ये भिजत ठेवावीत. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात आपट्याची पाने आणि थंडगार पाणी टाकावे, यानंतर त्याचा रस काढावा. हा रस प्यायल्याने आरोग्याला फायदा होतो.

7/7
जर तुम्हाला भूक लागत नसेल त्यासाठीही तुम्ही आपट्याच्या पानाची पावडर करून चिमूटभर पावडर पाण्यामध्ये टाकून सकाळी उपाशीपोटी प्यायलात तर तुम्हाला मदत होऊ शकते. पण हे सर्व वैद्यकीय सल्ल्याने किंवा मार्गदर्शनाने घ्यावे, असेही त्या म्हणाल्या.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement