advertisement

Lip Colour : अचानक बदलतोय ओठांचा रंग? गंभीर आजारांच्या धोक्याचा असू शकतो इशारा, एक कलर तर थेट हार्ट अटॅकचा देतो संकेत

Last Updated:
ओठ केवळ चेहऱ्याचे सौंदर्य वाढवत नाहीत तर ते आपल्या शरीराचे आरोग्य देखील दर्शवतात. ओठांचा बदलणारा रंग वेगवेगळ्या आरोग्य स्थिती दर्शवितो.
1/7
ओठ केवळ चेहऱ्याचे सौंदर्य वाढवत नाहीत तर ते आपल्या शरीराचे आरोग्य देखील दर्शवतात. ओठांचा बदलणारा रंग वेगवेगळ्या आरोग्य स्थिती दर्शवितो. आरोग्य तज्ञांच्या मते, ओठांचा रंग बदलणे हे बहुतेकदा शरीरातील अंतर्गत बदलांचे किंवा एखाद्या आजाराचे लक्षण असू शकते. हा रंग तुमच्या रक्ताभिसरणाची, पोषणाची कमतरता किंवा इतर कोणत्याही गंभीर आजाराची माहिती देऊ शकतो. ओठांचे वेगवेगळे रंग तुमच्या शरीरात होणाऱ्या आजारांचे संकेत कसे देतात ते जाणून घ्या.

2/7
लालसर ओठ: जरी महिला ओठ लाल करण्यासाठी लिपस्टिक वापरतात, परंतु जर लिपस्टिक न वापरता ओठ जास्त लाल होऊ लागले तर ते धोकादायक ठरू शकते. जर ओठांचा रंग गडद लाल होत असेल तर ते तुमच्या यकृतातील एखाद्या आजाराचे लक्षण असू शकते. यकृतामध्ये समस्या असताना ओठांचा रंग लाल होतो.

3/7
काळे ओठ: जे लोक सिगरेट ओढतात किंवा इतर प्रकारचे धूम्रपान करतात, त्यांचे ओठ हळूहळू काळे पडू लागतात. यासोबतच, जे लोक ओठांवर जास्त मेकअप वापरतात, त्यांचे ओठ देखील काळे पडू लागतात.

4/7
पांढरे ओठ: काही लोकांचे ओठ पांढरे किंवा गुलाबी तेलकट होऊ लागतात. हे अजिबात सामान्य नाही. पांढरे ओठ किंवा गुलाबी तेलकट ओठ हे शरीरातील अशक्तपणाचे लक्षण असू शकते. यासोबतच, रंगहीन किंवा पांढरे ओठ शरीरात पोषणाची कमतरता दर्शवतात.

5/7
निळे ओठ: जर एखाद्याचे ओठ अचानक निळे दिसू लागले तर ते हृदयरोग किंवा फुफ्फुसांच्या समस्येचे कारण असू शकते. जेव्हा हृदय किंवा फुफ्फुसे योग्यरीत्या कार्य करत नाहीत तेव्हा शरीरात ऑक्सिजनची कमतरता जाणवते आणि कार्बन डायऑक्साइड वाढते त्यामुळे ओठ निळे दिसू लागतात. जे आरोग्यासाठी धोकादायक असू शकते.

6/7
पिवळे ओठ: पिवळे ओठ हे तुमच्या शरीरातील बिलीरुबिनची पातळी वाढल्याचे दर्शवितात. हे देखील कावीळचे लक्षण आहे. पिवळे ओठ हे यकृतातील एखाद्या प्रकारच्या समस्येचे देखील लक्षण असू शकते.

7/7
हिरवे ओठ: जर ओठ हलके हिरवे होत असतील तर ते सर्दी किंवा फुफ्फुसातील समस्येचे लक्षण असू शकते. काही प्रकरणांमध्ये, ओठांचा जांभळा रंग श्वास घेण्यास त्रास होण्याचे लक्षण देखील असू शकतो. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement