Apricot Benefits: हिवाळ्यात फिट राहायचं आहे? मग खा ‘हा’ सुकामेवा, दूर पळतील अनेक आजार

Last Updated:
Health and Nutrition Benefits of Apricots in Marathi: सुकामेवा खाणं आरोग्यासाठी फायद्याचं आहे. सुकामेव्यातला एक पदार्थ म्हणजे जर्दाळू. दिसायलं फिक्कट पिवळसर रंग असलेल्या या फळामध्ये बी आढळून येतं. अनेकदा बी काढलेलं जर्दाळूही बाजारात मिळतं. जाणून घेऊयात हिवाळ्यात जर्दाळू खाण्याचे फायदे.
1/7
जर्दाळूमध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात आढळून येतात. जर्दाळू खाल्ल्याने मुक्त रॅडिकल्सपासून शरीराचं रक्षण होऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढायला मदत होते. त्यामुळे अनेक जुन्या आजारांविरूध्द लढण्याची ताकद शरीराला मिळते.

advertisement
2/7
जर्दाळूत पोटॅशियमचे चांगल्या प्रमाणात आढळून येतं. ज्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहायला मदत होते. हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा धोका कमी करण्यासाठी जर्दाळू खाणं हे फायद्याचं मानलं जातं.

3/7
जर्दाळूमध्ये फायबर्स चांगल्या प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे  चयापचय क्रिया सुधारून अन्न पचायला मदत होते. पोटफुगी, पोटात दुखणं किंवा पचनाच्या आजारासह बद्धकोष्ठतेचा आजार असलेल्या व्यक्तींसाठी जर्दाळू हे कोणत्या औषधांपेक्षा कमी नाहीये.

4/7
जर्दाळूमध्ये बीटा-कॅरोटीन चांगल्या प्रमाणात आढळून येतात. ते खाल्ल्यानंतर त्याचं रूपातंर व्हिटॅमिन ए मध्ये होतं जे डोळ्यांसाठी फायद्याचं आहे. विविध प्रकारचे दृष्टिदोष  असलेल्या व्यक्तींनी जर्दाळू खाल्लं तर त्यांचे डोळे निरोगी राहायला मदत होते.

5/7
जर्दाळू हा व्हिटॅमिन सी चा एक चांगला स्रोत आहे, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीसाठी वाढून रक्तातल्या पांढऱ्या पेशींची वाढ होते. यापेशी संसर्गजन्य आजारांशी लढण्यात फायद्याच्या ठरतात. जर्दाळू खाल्ल्यामुळे संभाव्या साथीच्या आजारांना दूर ठेवता येतं.

6/7
जर्दाळूमध्ये असलेले फायटोकेमिकल्समध्ये कर्करोगाविरोधात लढण्यात महत्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे जर्दाळू हे नैसर्गिक कर्करोगविरोधी औषध ठरतं. त्यामुळे जर्दाळू खाल्ल्याने संभाव्या कॅन्सरचा धोका टाळता येतो.

7/7
मासिक पाळीत ज्या महिलांना त्रास होतो त्यांच्यासाठी जर्दाळूत हे  कोणत्या औषधापेक्षा कमी नाहीये. जर्दाळूमुळे रक्त वाढायला मदत होते.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement