थंडीत खा 'हे' 5 पदार्थ, शरीर राहील उबदार; आजारांपासून होईल संरक्षण

Last Updated:
हिवाळ्यात थंडीपासून संरक्षण करण्यासाठी आपण गरम कपडे घालतो. शाल वापरतो आणि गरम पाण्याने आंघोळही करतो. त्वचा रखरखीत होऊ नये म्हणून विविध मॉइश्चरायझर वापरतो. तसंच हिवाळ्यात आहारदेखील महत्त्वाचा असतो. शरिरात उब निर्माण होईल अशा पदार्थांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.
1/5
चवीला गोड आणि पोषक तत्त्वांनी परिपूर्ण असलेलं मध शरिराला ऊर्जा देण्याचं काम करतं. शिवाय मधामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमालीची वाढते. हिवाळ्यात मध आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असतं. त्यामुळे घशाची खवखवही दूर होते.

advertisement
2/5
हिवाळ्यात देशी तूप खाण्याचा सल्लाही दिला जातो. त्यात फॅटी ऍसिड चांगल्या प्रमाणात असतं. ज्यामुळे शरिरात उब निर्माण होते आणि तापमान सामान्य राहतं. थंडीत दररोज देशी तूप खाणं अत्यंत फायदेशीर ठरतं.

3/5
थंडीत नियमितपणे गूळ खावं. त्यामुळे शरिरात उब निर्माण होते. गुळात भरपूर प्रमाणात कॅलरीज असतात. शिवाय गुळामुळे पचनक्रिया सुरळीत होते. नुसतं गूळ खायला आवडत नसेल, तर आपण गोडाच्या पदार्थांमध्ये किंवा जेवणात गुळाचा समावेश करू शकता.

4/5
अन्नपदार्थांची चव वाढवणारी दालचिनीदेखील थंडीत आरोग्यासाठी फायदेशीर असते. दालचिनीमुळे मेटाबॉलिज्मचं प्रमाण वाढतं. त्यामुळे थंडीत शरीर छान उबदार राहतं आणि दालचिनीचं पाणी प्यायल्यावर खोकलाही बरा होतो.

5/5
फोडणीत तडतडणारी मोहरी शरिरातलं तापमान उबदार ठेवण्यास ठरते फायदेशीर. त्यामुळे थंडीत जेवणात मोहरी आणि मोहरीच्या तेलाचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. मोहरीच्या आयसोथियोसायनेट गुणधर्मामुळे शरिरात उब निर्माण होते.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement