Mumbai Street Food: 7 सर्वोत्तम फूड स्पॉट, पदार्थ पाहूनच तोंडाला सुटतं पाणी
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
लुसलुशीत पाव, त्यात चण्याच्या पिठात तळलेला बटाट्याचा चमचमीत गरमागरम वडा, त्यावर लाल चटणी, हिरवी चटणी आणि झणझणीत हिरवी मिरची असा स्वादिष्ट वडापाव म्हणजे मुंबईची ओळख. मुंबईत कुठेही खाल्ला तरी एका वडापाववर काही खवय्यांचं भागत नाही एवढा तो टेस्टी लागतो. परंतु मुंबईत आणखीही काही पदार्थ खूप लोकप्रिय आहेत. आज आपण वडापावव्यतिरिक्त मुंबईत लय भारी स्ट्रीट फूड कुठे मिळतं अशी 7 ठिकाणं पाहणार आहोत. (प्रियंका जगताप, प्रतिनिधी / मुंबई)
advertisement
advertisement
चर्चगेटच्या के. रुस्तममधलं आइस्क्रीम सँडविच / बिस्किट : मुंबईतल्या सर्वात प्रसिद्ध आइस्क्रीम पार्लरपैकी एक असलेल्या के. रुस्तममध्ये दररोज शेकडो ग्राहकांची रेलचेल असते. काळ्या मनुका ते कॉफी, कच्ची कैरी, बदाम कुरकुरीत, रास्पबेरी, स्ट्रॉबेरी, चॉकलेट आणि दोन वेफर्समध्ये ते आइस्क्रीम बनवून देतात. तिची किंमत आहे 100 रुपये.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
रुईया कॉलेजजवळील मामाजीचं चॉकलेट सँडविच : मुंबईतील स्ट्रीट फूडमध्ये चॉकलेट सँडविच सामान्य आहेत, परंतु रुईया कॉलेजसमोरील पार्कजवळ विकलं जाणारे हे चॉकलेट सँडविच सर्वोत्तम असतं. त्यात Hershey'sचं चॉकलेट आणि काही चांगल्या दर्जाचं डार्क चॉकलेट वापरलं जातं. 50 रुपयांत मिळणारं हे सँडविच म्हणजे चवीच्या बाबतीत जणू स्वर्गसुख देतं.