मसाला पावपासून ते चीज तवा पुलाव, ठाण्यात एकाच ठिकाणी खा 10 हून अधिक प्रकारची पावभाजी
- Published by:News18 Marathi
- Reported by:Sakshi Sushil Patil
Last Updated:
ठाण्यात पाव भाजी कुणाची तर बाबा पावभाजीची, असे समीकरण ठरलं आहे. ठाण्यात असणारे बाबा पावभाजी हे रेस्टॉरंट वागळे इस्टेट इथे आहे. इथे पावभाजीचे एकूण 10 हुन अधिक प्रकार मिळतात.
महाराष्ट्रातील लोकप्रिय खाद्यपदार्थ म्हणून पावभाजी प्रसिद्ध आहे. ठाण्यात सुद्धा पावभाजीचे प्रसिद्ध रेस्टॉरंट आहे. ठाण्यातली बाबा पावभाजी हे रेस्टॉरंट म्हणजे ज्यांना पावभाजी आवडते, त्यांच्यासाठी तर मेजवानीच आहे. ठाण्यात पाव भाजी कुणाची तर बाबा पावभाजीची, असे समीकरण ठरलं आहे. ठाण्यात असणारे बाबा पावभाजी हे रेस्टॉरंट वागळे इस्टेट इथे आहे. इथे पावभाजीचे एकूण 10 हुन अधिक प्रकार मिळतात.
advertisement
advertisement
advertisement
यामध्ये मशरूम सँडविच, बार्बेक्यू पनीर सँडविच, बॉम्बे मसाला सँडविच, एक्झॉटिक व्हेजिटेबल क्लब सँडविच हे सँडविच उपलब्ध आहेत. यासोबतच बर्गर, पिझ्झा, पास्ता हे सुद्धा इथे चविष्ट मिळतात. खवय्यांना सगळ्या प्रकारच्या पावभाजी एकाच ठिकाणी मिळाव्यात, याच उद्देशाने सनी पावसकर यांनी यास बाबा पावभाजी रेस्टॉरंटची सुरुवात केली.
advertisement
इथे मिळणारे आईस्क्रीमसुद्धा खूप प्रसिद्ध आहे. यात सिझलिंग वोलनेट ब्राउनी ही अतिशय लोकप्रिय आहे. आता श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे. त्यामुळे या रेस्टॉरंटमध्ये श्रावण फूड स्पेशल म्हणजे उपवासाचे पदार्थ सुद्धा मिळणार आहेत. त्यामुळे श्रावण आज जर तुम्हाला चविष्ट शाकाहारी पदार्थ खाण्याची इच्छा झाली तर इथे नक्की जाऊ शकता.
advertisement
'आमच्या बाबा पावभाजीमुळे मिळणारी पावभाजी ही ठाण्यात खूप प्रसिद्ध आहे. इथे येणारे खवय्ये पावभाजी खाल्ल्याशिवाय जातच नाहीत. आम्ही रेस्टॉरंट मध्ये कोणताही पदार्थ बनवताना स्वच्छता ठेवतो,' असे बाबा पावभाजी रेस्टॉरंटचे मॅनेजर म्हणून काम पाहणाऱ्या संतोष यादव यांनी सांगितले. जर तुम्हालाही पावभाजीचे वेगवेगळे प्रकार ट्राय करायचे असतील तर नक्की ठाण्याच्या या बाबा पावभाजीला नक्की भेट देऊ शकतात.









