बकरीचं दूध आणि कांदा, उन लागल्यावर तुम्ही कधी केला वापर? मराठवाड्यातला रामबाण उपाय
- Reported by:Kale Narayan
- Published by:Mohan Najan
Last Updated:
मराठवाड्यातील ग्रामीण भागामध्ये आजही अनेक जण बकरीच्या दुधाचा वापर हा उन्हाळी वर जालीम उपाय म्हणून करतात. पाहुयात कशा पद्धतीने बकरीच्या दुधाचा वापर करून आपण उन्हाळी पासून मुक्तता मिळवू शकतो.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
हा उपाय केवळ लहान बाळांसाठीच नव्हे तर सर्व वयोगटांच्या महिला आणि पुरुषांसाठी उपयुक्त ठरतो. बकरीचे दूध तळपाय, तळहाताने लावल्यानंतर हातांना, पायांना थंडावा मिळतो. तसेच शरीरातील उष्णता कमी होऊन उन्हाळीच्या त्रासापासून सुटका मिळण्यास मदत होते. साधारणपणे 15 ते 20 मिनिटांमध्ये उन्हाळी लागलेल्या व्यक्तीला बकरीच्या दुधाने परिणाम जाणवतो, असं जाणकार विठ्ठल काळे यांनी सांगितलं.
advertisement
आम्ही हा उपाय आमच्या आजोबा पणजोबापासून उपयोगात आणत आहे. आजही ग्रामीण भागामध्ये ऊन लागल्यानंतर बकरीच्या दुधाचा वापर केला जातो. अनेकांना याबाबत माहिती नाही मात्र ज्यांना माहिती आहे ते बकरीच्या दुधाचा वापर अवश्य करतात, असं देखील काळे यांनी सांगितलं. तेव्हा तुम्हाला देखील कधी उन्हाळीचा किंवा उष्णतेचा त्रास झाला तर बकरीच्या दुधाचा वापर आवश्य करून बघा.










