किडनीसाठी वरदान कोथिंबीर सूप, घरीच बनवा अगदी सोपी रेसिपी
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Coriander Soup: कॅल्शिअमचा उत्तम स्त्रोत आणि किडनीसाठी वरदान मानलं जाणारं कोथिंबीर सूप अगदी सोप्या पद्धतीनं बनवता येतं. पाहा रेसिपी.
उत्तम आरोग्यासाठी आपल्या आहाराची विशेष काळजी घ्यावी लागते. प्रत्येक ऋतुतील पदार्थ आपल्या आहारात येण्याची गरज असते. हिवाळ्यात काहीजण सूप पिण्याला प्राधान्य देतात. विविध भाज्यांचेही सूप बनवले जाते. कोथिंबीरचे सूप पिणंही आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानलं जातं. छत्रपती संभाजीनगर येथील आहारतज्ज्ञ डॉ. प्रज्ञा तल्हार यांनी कोथिंबीर सूपची रेसिपी सांगितली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement








