Health Tips: आरोग्यदायी जीवनशैलीसाठी कोणते तेल फायदेशीर? कशात असतात जास्त पोषक घटक?

Last Updated:
Edible Oil: खाद्यतेल हा भारतासह जगभरातील लोकांच्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. प्रत्येकाने आपली आरोग्याची स्थिती लक्षात घेऊन तेलाची निवड करावी.
1/7
खाद्यतेल हा भारतासह जगभरातील लोकांच्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. बहुतांशी खाद्यपदार्थ बनवताना तेलाचा वापर होतो. तेलामुळे अन्नाची चव वाढते. पण, योग्य खाद्यतेलाची निवड करणे आरोग्यदायी जीवनशैलीसाठी खूप महत्त्वाचं आहे. तेल म्हणजे फक्त पदार्थांना चव देण्याचं माध्यम नाही, तर त्यातून आपल्या शरीरासाठी आवश्यक असलेले पोषक घटक देखील मिळतात.

advertisement
2/7
बाजारात अनेक प्रकारचं तेल उपलब्ध असल्यामुळे योग्य तेल निवडताना अनेक लोक गोंधळात पडतात. योग्य आणि संतुलित आहारासाठी योग्य तेलाची निवड करताना तेलातील फॅटचा प्रकार लक्षात घ्यावा लागतो. सॅच्युरेटेड फॅट जास्त असलेले तेल उदा. पाम ऑईल, बटर, आणि कॉर्कनट ऑईल हे जास्त प्रमाणात वापरल्यास हृदयविकाराचा धोका वाढतो. याउलट, अनसॅच्युरेटेड फॅट असलेलं तेल उदा. ऑलिव्ह ऑईल, नारळ तेल, सूर्यमुखी तेल, आणि सोयाबीन तेल शरीरासाठी चांगलं असतं.

3/7
ऑलिव्ह ऑईल, नारळ तेल, सूर्यमुखी तेल, आणि सोयाबीन तेल तेलांमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स असतात. हे घटक शरीराला ऊर्जा देतात आणि हृदयाचं आरोग्य सुधारतात. त्यामुळे दररोजच्या आहारात या तेलांचा समावेश करणे योग्य ठरते.

4/7
तेल खरेदी करताना तेलाचा स्मोक पॉईंट देखील लक्षात घेतला पाहिजे. खाद्यपदार्थ तळताना तेलाचा स्मोक पॉईंट जास्त असला पाहिजे. सूर्यफुलं तेल, पाम ऑईल किंवा रिफाइंड सोयाबीन ऑईल हे तेल जास्त तापमानातही सुरक्षित ठरतं.

5/7
त्यामुळे डीप फ्राईंगसाठी हे तेल चांगला पर्याय ठरतात. मात्र, सलाड टॉसिंग किंवा कमी तापमानावर पदार्थ तयार करताना एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल किंवा अनरिफाईन्ड नारळ तेल निवडले पाहिजे. कारण, त्यात पोषकतत्त्व जास्त असतात आणि चवही उत्कृष्ट असते.

6/7
कोणतंही तेल जास्त प्रमाणात खाल्लं तर ते शरीरासाठी हानीकारक ठरू शकते. दररोज 2 ते 3 टेबलस्पून तेल पुरेसे असते. जास्त तेल खाल्ल्याने वजन वाढते, हृदयावर ताण येतो आणि पचनसंस्था प्रभावित होते. त्यामुळे योग्य प्रमाणात तेलाचा वापर करणं आवश्यक आहे. प्रत्येकाने आपली आरोग्याची स्थिती लक्षात घेऊन तेलाची निवड करावी. उदाहरणार्थ, हृदयविकाराची समस्या असलेल्यांनी ऑलिव्ह ऑईल वापरावे, वजन कमी करायचं असल्यास नारळ तेलाचा वापर फायदेशीर ठरतो.

7/7
एकूणच, योग्य तेलाची निवड आपल्या आरोग्यासाठी अनिवार्य आहे. बाजारात असंख्य प्रकारचं तेल असलं तरी, पोषण, स्मोक पॉईंट आणि प्रमाण या तीन मुख्य गोष्टींचा विचार करून संतुलित आहार तयार करणं गरजेचं आहे. आरोग्य टिकवण्यासाठी दररोजच्या जेवणात योग्य प्रकारचं आणि प्रमाणबद्ध तेल वापरण्याची सवय लावावी. यामुळे शरीर तंदुरुस्त राहते, वजन नियंत्रणात राहते आणि हृदयाचं आरोग्यही चांगलं राहते.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement