AFG vs SA : वर्ल्ड कपची पहिली डबल SUPER OVER, मॅच जिंकली साऊथ आफ्रिकेने पण अफगाणिस्तानने सर्वांचा श्वास रोखला
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये साऊथ आफ्रकेने 24 धावा केल्या होत्या.त्यामुळे अफगाणिस्तानसमोर 25 धावांचे लक्ष्य होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तान 20 धावा करू शकली. त्यामुळे साऊथ आफ्रिकेने हा सामना 4 धावांनी जिंकला आहे.
Afganistan vs South Africa Super Over : अफगाणिस्तानने सुपर ओव्हरमध्ये दिलेल्या 18 धावांचा पाठलाग करताना साऊथ आफ्रिकेने 17 धावा करून सामना पुन्हा बरोबरीत सुटला होता. त्यामुळे हा सामना पुन्हा सुपर ओव्हरमध्ये गेला होता.दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये साऊथ आफ्रकेने 24 धावा केल्या होत्या.त्यामुळे अफगाणिस्तानसमोर 25 धावांचे लक्ष्य होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तान 20 धावा करू शकली. त्यामुळे साऊथ आफ्रिकेने हा सामना 4 धावांनी जिंकला आहे. या दोन्ही सूपर ओव्हरआधी दोन्ही संघानी 187 धावा केल्याने हा सामना बरोबरीत सुटला होता.
दुसरी सुपर ओव्हर
अफगाणिस्तानसमोर 25 धावांचे लक्ष्य होते.
पहिला बॉल: केशव महाराज पहिल्या बॉलवर एकही धाव आली नाही.
दुसरा बॉल : मोहम्मद नबी आऊट झाला.
तिसरा बॉल : गुरबाजने सिक्स मारला.
चौथा बॉल : गुरबाजने पुन्हा सिक्स मारला.
पाचवा बॉल : गुरबाजने तिसरा सिक्स मारला.
सहावा बॉल :वाईड बॉल टाकला
advertisement
सहावा बॉल : गुरबाज कॅच आऊट झाला.
साऊथ आफ्रिकेचा डाव
दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये साऊथ आफ्रिकेने 24 धावा काढल्या होत्या.
पहिला बॉल : अझमत फारुकीच्या पहिल्या बॉलवर ट्रिस्टन स्टब्सने षटकार मारला होता.
दुसरा बॉल : अझमत फारुकीच्या दुसऱ्या बॉलवर ट्रिस्टन स्टब्सने एक धाव काढली.
तिसरा बॉल : डेविड मिलरने दोन धावा काढल्या.
advertisement
चौथा बॉल : अझमतने मिलरला षटकार खेचला.
पाचवा बॉल : डेविड मिलरने पुन्हा षटकार मारला.
सहावा बॉल : डेविड मिलरने दोन धावा काढल्या
पहिली सूपर ओव्हर
अफगाणिस्तानकडून अझमत आणि गुरबाज मैदानात उतरले आहेत. तर आफ्रिकेकडून एनगिडी गोलंदाजी आला होता.
पहिला बॉल : लुंगी एनगिडीच्या पहिल्या बॉलवर अझमतने चौकार मारला होता.
advertisement
दुसरा बॉल : लुंगी एनगिडीच्या पहिल्या बॉलवर अझमतने षटकार मारला होता.
तिसरा बॉल : तिसऱ्या बॉलवर अझमतने एक धाव काढली.
चौथा बॉल : चौथ्या बॉलवर गुरबाजने एक धावा घेतली.
पाचवा बॉल : अझमतने चौकार मारला होता.
सहावा बॉल : अझमतने 1 धाव काढली.
अफगाणिस्तान 17 धावा करू शकली होती त्यामुळे सुपर ओव्हरमध्ये आफ्रिकेसमोर 18 धावांचे लक्ष्य होते.
advertisement
दक्षिण आफ्रिकेचा डाव
पहिला बॉल : फारुकीच्या बॉलवर मिलरने 1 धाव काढली.
दुसरा बॉल : डेवाल्ड ब्रेविसने फारूकीच्या बॉलवर षटकार मारला.
विजयासाठी 4 बॉलमध्ये 11 धावा हव्या होत्या.
तिसरा बॉल : फारूकीच्या बॉलवर डेवाल्ड ब्रेविस बाद झाला.
विजयासाठी 3 बॉलमध्ये 11 धावा हव्या होत्या.
चौथा बॉल : ट्रिस्टन स्टब्सने चौकार मारला.
advertisement
विजयासाठी 2 बॉलमध्ये 7 धावा हव्या होत्या.
पाचवा बॉल : स्टब्सला एकही धाव काढता आली नाही.
सहाव्या बॉल : स्टब्सने षटकार मारला होता.
सुपर ओव्हरमध्ये दोन्ही संघांचा स्कोअर बरोबरीत, मॅच सेकेंड सुपर ओव्हरमध्ये गेली होती. या दोन्ही सूपर ओव्हरआधी दोन्ही संघानी 187 धावा केल्याने हा सामना बरोबरीत सुटला होता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 11, 2026 3:25 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
AFG vs SA : वर्ल्ड कपची पहिली डबल SUPER OVER, मॅच जिंकली साऊथ आफ्रिकेने पण अफगाणिस्तानने सर्वांचा श्वास रोखला










