advertisement

Milk : तुम्ही पित असलेलं दूध सुरक्षित आहे का? अमूलसह इतर पॅकेट दुधाबाबत का वाढली चर्चा! नेमकं प्रकरण जाणून घ्या

Last Updated:

एका व्हायरल व्हिडिओने सुरू झालेला हा वाद आता थेट बड्या ब्रँड्सच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे करत आहे. नक्की काय आहे हे प्रकरण आणि सर्वसामान्यांनी घाबरून न जाता कोणती काळजी घ्यावी? यावर टाकूया एक सखोल नजर.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : सकाळ झाली की आपल्या घरात सर्वात पहिली एन्ट्री होते ती दुधाच्या पिशवीची. चहा असो, कॉफी असो किंवा मुलांच्या आरोग्यासाठी दिले जाणारे दूध; दूध हा आपल्या आहारातील सर्वात मूलभूत आणि विश्वासार्ह घटक मानला जातो. हे शरीरासाठी चांगलं असतं त्यामुळे डॉक्टर देखील ते पिण्याचा सल्ला देतात. पण गेल्या काही दिवसांपासून याच दुधाने देशभरात एकच खळबळ उडवून दिली आहे. सोशल मीडियापासून ते संसदेपर्यंत सध्या एकच चर्चा सुरू आहे आपण जे दूध पितोय ते खरंच सुरक्षित आहे का?
एका व्हायरल व्हिडिओने सुरू झालेला हा वाद आता थेट बड्या ब्रँड्सच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे करत आहे. नक्की काय आहे हे प्रकरण आणि सर्वसामान्यांनी घाबरून न जाता कोणती काळजी घ्यावी? यावर टाकूया एक सखोल नजर.
CNBC मध्ये पब्लिश झालेल्या वृत्तानुसार 'Trustified' नावाच्या एका स्वतंत्र टेस्टिंग प्लॅटफॉर्मने केलेल्या दाव्यामुळे हा वाद पेटला आहे. त्यांच्या रिपोर्टनुसार अमूल (Amul Taaza & Gold) यात 'कोलिफॉर्म बॅक्टेरिया'चे प्रमाण FSSAI ने ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा चक्क 98 पटीने जास्त आढळल्याचा दावा करण्यात आला आहे. मदर डेअरी आणि कंट्री डिलाईट या ब्रँड्सच्या पिशवीतील दुधातही स्वच्छतेच्या निकषांचे उल्लंघन झाल्याचे म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी अमूल मस्ती दह्याबाबतही अशाच तक्रारी समोर आल्या होत्या.
advertisement
पण अमूलने हे सर्व दावे फेटाळून लावले आहे आणि त्यांचे उत्पादन सर्व सुरक्षा मानकांनुसार असल्याचे म्हटले आहे. कंपनीच्या मते, जर काही दोष असेलच, तर तो ट्रान्सपोर्ट दरम्यान 'कोल्ड चेन' (Cold Chain) तुटल्यामुळे असू शकतो, उत्पादनात नाही.
हा केवळ एका लॅब रिपोर्टचा प्रश्न नाही. गेल्या महिनाभरात गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये पोलिसांनी भेसळ करणाऱ्या दुग्धशाळांवर छापे टाकले. गुजरातमध्ये एका छाप्यात आढळले की 300 लिटर शुद्ध दुधात पाणी, मिल्क पावडर, कॉस्टिक सोडा, तेल, डिटर्जंट आणि युरिया मिसळून तब्बल 1800 लिटर बनावट दूध तयार केले जात होते. ही आकडेवारी कोणाचीही झोप उडवण्यासाठी पुरेशी आहे.
advertisement
ग्राहकांनी नेमकं काय करावं?
तुम्ही पिशवीतील दूध घेत असाल, तर ते घरी आल्याबरोबर लगेच उकळा. फक्त पाश्चरायझेशनवर (pasteurisation) विसंबून राहू नका. विशेषतः लहान मुलं किंवा वृद्ध व्यक्तींसाठी अधिक सुरक्षित पर्याय हवा असेल, तर सध्या UHT किंवा टेट्रा पॅक दूध अधिक सुरक्षित मानलं जातं.
रासायनिक भेसळेबाबत चिंता असेल, तर घरच्या घरी काही सोप्या चाचण्या करता येतात. स्टार्च तपासण्यासाठी उकळलेल्या दुधात आयोडिनचे काही थेंब टाका; दूध निळं झालं तर त्यात भेसळ असण्याची शक्यता आहे. डिटर्जंट तपासण्यासाठी दूध आणि पाणी एकत्र करून बाटलीत हलवा; जर अनैसर्गिक आणि जास्त वेळ टिकणारी फेस आली, तर शंका घ्यावी. युरिया तपासण्यासाठी लाल लिटमस पेपर वापरू शकता. दूध आणि तूर डाळीच्या पावडरच्या मिश्रणात तो बुडवला असता तो निळा झाला, तर युरियाची भेसळ असू शकते.
advertisement
याशिवाय DRDO-मान्यताप्राप्त (approved) घरगुती चाचणी किट्सही ऑनलाइन परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध आहेत.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Milk : तुम्ही पित असलेलं दूध सुरक्षित आहे का? अमूलसह इतर पॅकेट दुधाबाबत का वाढली चर्चा! नेमकं प्रकरण जाणून घ्या
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement