Health Tips: चुकीच्या आहारामुळे जाणवतोय शरीराला थकवा, होईल कायमचा गायब, आहारात हे पदार्थ चुकवू नका!

Last Updated:
Health Tips: केवळ विश्रांती कमी पडल्यामुळे नाही, तर चुकीच्या आहारामुळेही शरीर थकते. त्यामुळे थकवा जाणवत असेल तर कसा आहार घ्यावा? जाणून घ्या.
1/7
सतत थकवा जाणवणे, दिवसभर काम करण्याची ऊर्जा कमी होणे आणि शरीरामध्ये उत्साह न राहणे ही लक्षणे हल्ली सर्वसामान्य झाली आहेत. विशेषतः शहरापासून ग्रामीण भागांपर्यंत अनेकजण या समस्येला सामोरे जात आहेत.

advertisement
2/7
केवळ विश्रांती कमी पडल्यामुळे नाही, तर चुकीच्या आहारामुळेही शरीर थकते. त्यामुळे थकवा जाणवत असेल तर कसा आहार घ्यावा? याबद्दलचं डॉ. अनिल देशपांडे यांनी माहिती सांगितली आहे.

3/7
थकवा दूर करण्यासाठी शरीराला आवश्यक असणारी ऊर्जा प्रथिनांमधून मिळवली जाते. प्रथिनयुक्त आहारामुळे स्नायूंना ताकद मिळते आणि शरीर सुदृढ राहते.

4/7
 यासाठी अंडी, दूध, ताक, दही यांचा समावेश दररोजच्या जेवणात करावा. शाकाहारी व्यक्तींनी मूग, तूरडाळ, हरभरा यांचा वापर वाढवावा. सोबतच अक्रोड, बदाम, शेंगदाणे यांसारखे सुकामेवे देखील उपयुक्त ठरतात.

5/7
ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी शरीराला कार्बोहायड्रेट्सचीही गरज असते. गहू, नाचणी, बाजरी, ओट्स, ब्राउन राईस यासारखे संपूर्ण धान्यांचे सेवन केल्यास शरीराला दीर्घकाळ ऊर्जा मिळते. याशिवाय फळांमधून मिळणारी नैसर्गिक साखर देखील थकवा कमी करण्यास मदत करते. केळे, सफरचंद, संत्रे ही फळे दररोज खाल्ल्यास शरीर ताजंतवाने राहते.

6/7
थकव्याचे आणखी एक मुख्य कारण म्हणजे लोहतत्त्वाची कमतरता. रक्तामधील हिमोग्लोबिनची पातळी कमी झाल्यास शरीराला ऑक्सिजन योग्य प्रमाणात पोहोचत नाही आणि थकवा जाणवतो. यासाठी पालक, चुकंदर, मेथी, खजूर, मनुका, अंजीर यांचा आहारात समावेश करावा. तसेच काहींना बी 12 आणि डी 3 या जीवनसत्त्वांची कमतरता असते, त्यामुळे वेळेवर तपासणी करून योग्य पूरक औषधे घ्यावीत.

7/7
शेवटी शरीराला हायड्रेट ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. दिवसभरात किमान 8–10 ग्लास पाणी पिणे, लिंबूपाणी, नारळपाणी, ताक यांचे सेवन केल्याने शरीरातील खनिजांचे प्रमाण संतुलित राहते. थकवा कमी करण्यासाठी केवळ आहारच नव्हे, तर नियमित व्यायाम, ताण-तणाव टाळणे आणि पुरेशी झोप घेणे हे देखील तितकेच आवश्यक आहे.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement