Health Tips : हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते? खोबऱ्याचं नाही तर 'या' तेलाचा करा असा वापर, राहील तजेलदार!
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
त्वचेसाठी नैसर्गिक आणि प्रभावी उपाय म्हणजे बदामाचं तेल. हिवाळ्यात बदामाचं तेल वापरण्याचे काय फायदे आहेत पाहुयात.
advertisement
बदामाच्या तेलात व्हिटॅमिन E, व्हिटॅमिन A, ओमेगा 3 फॅटी ॲसिड आणि अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात. हे सर्व घटक त्वचेला खोलवर पोषण देतात, स्किनला मॉईश्चराइज करतात आणि त्वचा मऊ, चमकदार बनवतात. हिवाळ्यात त्वचेवर येणारे ड्राय पॅचेस, खाज, लालसरपणा आणि कोरडी त्वचा यावर बदामाचं तेल अतिशय फायदेशीर ठरतं. हलक्या हाताने चेहऱ्यावर मसाज केल्याने रक्ताभिसरण वाढतं आणि त्यामुळे त्वचेला नैसर्गिक चमक येते.
advertisement
advertisement
बोटांवर 2–3 थेंब तेल घ्या, हलकेसे दोन्ही तळहाताने गरम करा आणि 2 ते 3 मिनिटे चेहऱ्यावर गोलाकार मसाज करा. तुमच्या रोजच्या मॉईश्चरायझरमध्ये 1–2 थेंब बदाम तेल मिक्स करून चेहऱ्यावर लावा. यामुळे त्वचा आणखी मऊ आणि हायड्रेट राहते. तुमच्या बेसन, मध किंवा कोरफड जेलच्या फेस पॅकमध्ये 2–3 थेंब बदाम तेल मिक्स करा आणि 10–15 मिनिटांनी धुवून टाका. रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवा, 2 थेंब तेल डोळ्यांखाली आणि 3–4 थेंब पूर्ण चेहऱ्यावर लावून हलका मसाज करा आणि रात्रभर तसेच ठेवा. फेस स्टीम घेतल्यानंतर त्वचेची छिद्रं उघडतात. अशावेळी लगेच बदामाचं तेल लावलं तर ते त्वचेत खोलवर शोषलं जातं आणि त्याचा फायदा दुप्पट होतो.
advertisement
बदामाचे तेल हलकं आणि नॉन-स्टिकी असल्यामुळे ते त्वचेत पटकन शोषलं जातं आणि चेहरा तेलकट न वाटता आतून मॉईश्चराइझ होतो. यामुळे फाईन लाईन्स कमी दिसतात आणि त्वचा अधिक तरुण, तजेलदार दिसते. तर हिवाळ्यात रासायनिक क्रीम्सपेक्षा निसर्गाने दिलेलं बदामाचं तेल तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये नक्की समाविष्ट करा आणि मिळवा नैसर्गिक, निरोगी आणि चमकदार त्वचा.


