advertisement

सुकलेली तुळस देते 'या' गंभीर संकटांचे संकेत, वेळीच करा हे उपाय; अन्यथा होईल नुकसान!

Last Updated:

शास्त्रानुसार जर तुमच्या घरातील तुळस खूप काळजी घेऊनही वारंवार सुकत असेल, तर ते भविष्यात येणाऱ्या एखाद्या मोठ्या संकटाचे किंवा घरावरील नकारात्मक ऊर्जेचे लक्षण असू शकते.

News18
News18
Vastu Tips : हिंदू धर्मात तुळशीला केवळ एक रोप मानले जात नाही, तर तिला 'साक्षात लक्ष्मी'चे रूप मानले जाते. ज्या घरात तुळस हिरवीगार आणि टवटवीत असते, तिथे सुख-समृद्धी नांदते. मात्र, शास्त्रानुसार जर तुमच्या घरातील तुळस खूप काळजी घेऊनही वारंवार सुकत असेल, तर ते भविष्यात येणाऱ्या एखाद्या मोठ्या संकटाचे किंवा घरावरील नकारात्मक ऊर्जेचे लक्षण असू शकते. अंकशास्त्र आणि वास्तुशास्त्रानुसार, तुळस सुकणे हे केवळ नैसर्गिक नसून त्यामागे काही आध्यात्मिक आणि ज्योतिषीय कारणे असू शकतात.
घरातील नकारात्मक ऊर्जा
वास्तुशास्त्रानुसार, जर घरात नकारात्मक ऊर्जा किंवा वास्तुदोष असेल, तर त्याचा पहिला परिणाम तुळशीवर होतो. तुळस ही घरातील नकारात्मकता स्वतःमध्ये शोषून घेते, ज्यामुळे ती सुकायला लागते.
बुध ग्रहाचा प्रभाव
ज्योतिषशास्त्रानुसार, तुळशीचा संबंध 'बुध' ग्रहाशी आहे. बुध हा बुद्धी आणि संपत्तीचा कारक आहे. जर तुमची तुळस सुकत असेल, तर याचा अर्थ तुमचा बुध ग्रह कमकुवत होत आहे, ज्यामुळे आर्थिक नुकसान किंवा व्यवसायात तोटा होऊ शकतो.
advertisement
वारंवार तुळस सुकू नये म्हणून करा 'हे' उपाय
दिवा आणि आरती: तुळशीच्या जवळ दररोज संध्याकाळी शुद्ध तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. असे केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते आणि तुळस बहरते. दिवा लावताना "शुभं करोति कल्याणं…" हा मंत्र म्हणावा.
काचेचे भांडे किंवा घाणेरडे पाणी टाळा: तुळशीला चुकूनही खरकटे किंवा अस्वच्छ पाणी घालू नका. तसेच तुळशीच्या कुंडीत काचेचे तुकडे किंवा लोखंडी वस्तू नसाव्यात. यामुळे तुळशीचे पावित्र्य भंग पावते आणि ती सुकते.
advertisement
मंजिरी काढून टाका: तुळशीवर 'मंजिरी' जास्त प्रमाणात येणे हे झाडासाठी भार मानले जाते. शास्त्रानुसार, मंजिरीमुळे तुळशीला कष्ट होतात. त्यामुळे वेळोवेळी मंजिरी काढून देवाच्या चरणी अर्पण कराव्यात, ज्यामुळे तुळस पुन्हा हिरवीगार होते.
चुकीची दिशा टाळा: तुळस कधीही दक्षिण दिशेला ठेवू नये. ही दिशा यमराजाची मानली जाते. तुळशीसाठी उत्तर किंवा ईशान्य दिशा सर्वात शुभ आहे. योग्य दिशेला ठेवलेली तुळस घरामध्ये धनाचे आगमन वाढवते.
advertisement
काळा रंग आणि अस्वच्छता: तुळशीच्या आजूबाजूला काळे कपडे सुकवू नका किंवा तिथे कचरा जमा होऊ देऊ नका. तुळशीच्या कुंडीला कधीही काळा रंग देऊ नका, कारण हा रंग ऊर्जेला अडथळा निर्माण करतो.
पितृदोषाचे निवारण: वारंवार तुळस सुकणे हे पितृदोषाचे लक्षणही मानले जाते. अशा वेळी अमावस्येला पितरांच्या नावाने दानधर्म करावा आणि तुळशीला गुरुवारी कच्चे दूध अर्पण करावे. यामुळे पितरांचा आशीर्वाद मिळतो आणि तुळस मरत नाही.
advertisement
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
सुकलेली तुळस देते 'या' गंभीर संकटांचे संकेत, वेळीच करा हे उपाय; अन्यथा होईल नुकसान!
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement