Health Tips: जेवणात जास्त मीठ खाताय? आताच टाळा ही सवय, नाहीतर होतील गंभीर आजार

Last Updated:
बऱ्याचवेळा मीठ आणि साखर या पदार्थांना पांढरे विष असेही संबोधले जाते. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हे लक्षात नाही की आपण आहारामध्ये मीठ जास्त खातो.
1/7
आहारात मिठाचे जास्त प्रमाणात सेवन हे एक अदृश्य महासाथीचे मुख्य कारण बनत आहे, असा इशारा भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने दिला आहे. जास्त मीठ खाल्ल्याने लोकांमध्ये उच्च रक्तदाब, लकवा, हृदयरोग आणि मूत्रपिंडाच्या विकारांचा धोका वाढतो.

advertisement
2/7
 मीठ म्हणजे अन्नाला चव आणणारा, रुची वाढवणारा पदार्थ कमी प्रमाणात लागणारा, पण सहाही रसांमध्ये महत्त्वाचे स्थान असलेले लवणरस म्हणजे मीठ, कारण याचा अभाव अन्नाला बेचव करण्यास कारणीभूत ठरतो, तर अति मात्रेत हा अनेक आजारांना आमंत्रण देतो. याबद्दलचं आहार तज्ज्ञ डॉ. संतोष नेवपुरकर यांनी माहिती दिली आहे.

3/7
बऱ्याचवेळा मीठ आणि साखर या पदार्थांना पांढरे विष असेही संबोधले जाते. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हे लक्षात नाही की आपण आहारामध्ये मीठ जास्त खातो. आहारामध्ये मीठ असतेच, पण काही पालेभाज्यांमध्ये नैसर्गिकरित्या मीठ असते, तसेच याप्रमाणे लोणच्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात मीठ असते.

4/7
पापड बाहेर जेवायला गेल्यानंतर सर्वप्रथम मसाला पापडाची ऑर्डर दिली जाते, मात्र यामध्ये देखील मुळातच मिठाचे प्रमाण जास्त असते आणि पुन्हा वरून मसाला वापरला जातो. याबरोबरच फरसाणमध्ये मीठ असते. डब्ल्यूएचओ असे सांगते की दिवसभरात 5 ग्रॅम मीठ इतके सेवन करायला पाहिजे, असे आहार तज्ज्ञ डॉ. संतोष नेवपुरकर यांनी लोकल 18 सोबत बोलताना म्हटले आहे.

5/7
मिठाच्या अतिसेवनाने रक्तदाब, हृदयरोग, सूज, स्थूलपणा, किडनीशी संबंधित आजार, त्वचाविकार, केसांचे विकार, मनोविकार, हाडांची दुर्बलता, दृष्टीशी संबंधित विकार यातील बरेच आजार होऊ शकतात. ते प्राणघातक असून, दबक्या पावलांनी येतात. त्यामुळे मीठ हे सायलेंट किलर म्हटले जाते.

6/7
मीठ योग्य त्या मात्रेत खाण्याची सवय लावावी. कच्चे मीठ किंवा पदार्थामध्ये भरून शिजवल्यानंतर टाकलेले मीठ पूर्णतः बंद करावे. पाण्यात मीठ वरून वाढवून घेऊ नये.

7/7
समुद्री मिठाऐवजी कमी सोडियम असलेले शेंदीलोण किंवा खडे मीठ वापरावे. यालाच आयुर्वेदात 'सैंधव लवण' असे म्हटले जाते. आठवड्यातून एक दिवस निर्लवन पथ्य पाळावे म्हणजे मिठाचे पदार्थ खाऊ नयेत, असे देखील डॉ. संतोष नेवपुरकर यांनी सांगितलं.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement