उन्हाळ्यात सनस्क्रीन त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर, वापरताना ही चूक करू नका, नाहीतर होतील गंभीर परिणाम
- Reported by:Pragati Bahurupi
- Published by:Mohan Najan
Last Updated:
उन्हाळा सुरू झाला आहे आणि आता तापमानवाढीमुळे त्वचेच्या समस्या निर्माण होतात. अशावेळी सनस्क्रिन वापरण्याकडे कल वाढतो. तर सनस्क्रीन वापरताना कोणत्या बाबी लक्षात घ्यायला पाहिजेत? याबाबत माहिती जाणून घेऊ.
उन्हाळा सुरू झाला की तापमान वाढीमुळे त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे त्वचेच्या प्रकारानुसार सनस्क्रीन वापरण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. पण, सनस्क्रीन वापरताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे? हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. कारण मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सनस्क्रीन उपलब्ध आहेत. काही वेळा व्यस्त सनस्क्रीन घेण्याच्या नादात आपण पैसे वाया घालवतो.
advertisement
advertisement
advertisement
सर्वात महत्त्वाचे म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सनस्क्रीन घेऊ नये. कारण आपल्या त्वचेचा प्रकार आपल्याला माहीत नसतो आणि चुकीचे प्रॉडक्ट आपल्या त्वचेला हानी पोहोचवतात. तेलकट त्वचेसाठी वेगळे सनस्क्रीन असतात आणि नॉर्मल, कोरड्या त्वचेसाठी वेगळे सनस्क्रीन असतात. त्यामुळे डॉक्टरांना दाखवूनच सनस्क्रीन खरेदी करा.
advertisement
advertisement
advertisement









