Makar Sankranti : तिळाचे लाडू कडक होतात, चावता चावत नाहीत? वापरा 'ही' सोपी ट्रिक लाडू होतील मऊ

Last Updated:
मकरसंक्रांतीचा सण देशभरात विविध पद्धतीने साजरा केला जातो. यानिमित्ताने महाराष्ट्रातील घराघरात तिळाचे लाडू बनवले जातात. परंतु तिळगुळाचे लाडू बनवत असताना जर योग्य रेसिपी आणि पदार्थांचं प्रमाण घेतलं नाही तर हे लाडू बिघडू शकतात. काहीजणांचे तिळाचे लाडू हे फार कडक होतात आणि ते चावता चावत नाहीत. मग हे कडक झालेले लाडू घरात कोणतीही खात नाही. तेव्हा तुम्हाला तिळाच्या लाडवांची सोपी रेसिपी सांगणार आहोत ज्यामुळे तुमचे तिळाचे लाडू झटपट आणि मऊ होतील.
1/5
हिवाळ्यात तिळाचे लाडू खाणे अतिशय पौष्टिक समजले जाते. याच कारण म्हणजे तिळामध्ये फायबर, कॅल्शियम, लोह, ओमेगा-6 फॅटी ऍसिड, मॅंगनीज, व्हिटॅमिन ई आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात. हिवाळ्यात तिळाचे सेवन केल्याने त्यातून शरीराला उष्णता मिळते तसेच तिळाच्या सेवनाने हाडे मजबूत होतात आणि हृदय देखील निरोगी राहते.

advertisement
2/5
तिळाचे लाडू करण्यासाठी अर्धा किलो तीळ, पाव किलो शेंगदाणे, 25 ग्रॅम चण्याची डाळ, अर्धा किलो गूळ, तूप, वेलची पावडर, लाडू सजवण्यासाठी पिस्ता इत्यादी साहित्यांचा वापर करावा.

3/5
तिळगुळाचे लाडू तयार करण्यासाठी सर्वप्रथम कढईत तीळ आणि शेंगदाणे भाजून घ्या. तिळाला तपकिरी रंग येईपर्यंत भाजून घ्या. भाजून झाल्यावर एका ताटात काढा आणि काही काळ थंड करत ठेवा. मग शेंगदाण्याच्या साल काढून घ्या. तसेच मिक्सरमधून शेंगदाण्याचे कूट तयार करून घ्या.

4/5
मग कढईत चमचाभर तूप टाका आणि मग बारीक केलेला गूळ तुपात टाका. गूळ पूर्णपणे वितळला की तो बोटाला चिकटतो की नाही ते तपासून घ्या. गूळ वितळला की त्यात तीळ, शेंगदाणे, पिस्ता इत्यादी टाकून सर्व एकत्रित मिक्स करून घ्या.

5/5
मिश्रण एकजीव झाल्यावर ताटात काढून घ्या आणि मिश्रण गरम असतानाच लाडू वळून घ्या. मिश्रण थंड झाल्यावर लाडू वळल्यास ते कडक होतात. तेव्हा मिश्रण गरम असतानाच लाडू वळल्यास ते मऊ होतात आणि दातांनी सहज चावता येतात. लाडू वळल्यावर ते थोडावेळ हवेवर ठेवा. अशाप्रकारे तुमचे स्वादिष्ट आणि मऊ तिळाचे लाडू तयार होतात.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement