जास्त मीठ खाताय? सावधान! WHO चा गंभीर इशारा, भारताला 'सायलेंट सॉल्ट' महामारीचा विळखा!

Last Updated:
जास्त मीठ खाणे ही भारतातील एक 'सायलेंट सॉल्ट एपिडेमिक' बनली आहे, अशी भीती WHO ने व्यक्त केली आहे. यामुळे उच्च रक्तदाब, हृदयविकार आणि...
1/6
 भारतात जास्त मीठ खाण्यामुळे एक नवी साथ पसरली आहे, त्याला Silent Salt Epidemic असे नाव जागतिक आरोग्य संघटनेने दिलेले आहे. आता तर संपूर्ण भारत या मिठाच्या साथीच्या विळख्यात सापडला आहे. जर आपण आता काळजी घेतली नाही, तर हा धोका आणखी वाढेल हे सांगायला नको.

advertisement
2/6
 जागतिक आरोग्य संघटनेनं असा इशारा दिला आहे की, ही Silent Salt Epidemic भारतातील बहुसंख्य लोकांना धोक्यात घालत आहे. उच्च रक्तदाब, हृदयविकार आणि स्ट्रोकसारख्या गंभीर समस्या वाढत आहेत. जास्त मीठ खाण्याची सवय एक मोठा धोका बनत आहे.

3/6
 WHO च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, एका प्रौढ व्यक्तीनं दररोज जास्तीत जास्त 5 ग्रॅम मीठ खावं. पण, शहरी भागातील एक भारतीय दररोज सरासरी 9.2 ग्रॅम मीठ खातो. ग्रामीण भागात हे प्रमाण 5.6 ग्रॅम आहे. सगळेच जण जाणूनबुजून जास्त मीठ खात नाहीत. खरं तर, चिप्स, पॅकबंद पदार्थ, रस्त्यावर मिळणारे पदार्थ आणि रेस्टॉरंटमधील जेवणात असलेलं जास्त मीठ ही समस्या वाढवत आहे.

4/6
 डॉक्टरांचं म्हणणं आहे की, मिठाच्या सेवनात थोडासा बदल केल्यास रक्तदाब सुमारे 7/4 mmHg ने कमी होऊ शकतो. तुम्ही पॅकबंद स्नॅक्स, इन्स्टंट नूडल्स आणि फास्ट फूड कमी खाल्लं पाहिजे. तसंच, शिजवलेल्या पदार्थांमध्ये मिठाचं प्रमाण कमी करायला हवं.

5/6
 मीठ हा आपल्या आहाराचा एक महत्त्वाचा घटक आहे. पण, जास्त मीठ खाल्ल्यानं अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. जागतिक आरोग्य संघटनेनं याबाबत इशारा दिला आहे.

6/6
 साधारणपणे, पांढरं मीठ, काळं मीठ, सैंधव मीठ आणि गुलाबी मीठ, या प्रत्येक मिठाचे वेगवेगळे गुणधर्म आहेत. मात्र, यापैकी कोणतंही मीठ शरीरासाठी जास्त प्रमाणात चांगलं नाही. अनेक जणांना खूप मीठ असल्याशिवाय जेवण जात नाही. ही सवय कधीतरी मोठ्या धोक्याला आमंत्रण देऊ शकते.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement