एक से एक Marathi Mhani, मराठी भाषेचं सौंदर्य वाढवणाऱ्या दर्जेदार अस्सल 'मराठी म्हणी'..!
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Marathi Mhani With Meaning : मराठीच्या सेवेला वाहून घेणाऱ्या कुसुमाग्रजांचा जन्मदिनच मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा दिन. भाषेचा दर्जा उंचावण्यासाठी आणि भाषेचे सौंदर्य वाढविण्यासाठी म्हणी, वाक्प्रचारांचा योग्य ठिकाणी वापर आवश्यक असतो. चारचौघात बोलताना भाषा अलंकाराचा वापर केला तर भाषा चातुर्य व भाषेची लवचिकता आत्मसात होते. मराठी भाषेमध्ये दररोजच्या बोलण्यात लिखाणात म्हणींचा वापर सर्रास केला जातो. विद्यार्थ्यांची भाषा विषयावरील प्रभुत्व मिळवायचे असेल तर शब्द संपदा असणे गरजेचे असते.
आपलेच दात आणि आपलेच ओठ.. कधीकधी एखाद्या निर्णयामुळे जेव्हा आपले नुकसान होते आणि दुसऱ्या कोणाचीच त्यामध्ये काही चूक नसते. अशावेळी हे म्हणले जाते. आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पहायचं वाकून.. एखादी व्यक्ती जेव्हा स्वतःबद्दलच्या सर्व गोष्टी लपवून ठेवते आणि दुसर्यांबद्दल सर्वकाही जाणून घेण्यासाठी संख्या चौकशा करते. तेव्हा असे म्हणतात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement