हिवाळ्यात उत्तम आरोग्यासाठी बनवा नाचणीचं सूप, सोपी रेसिपी लगेच नोट करा

Last Updated:
थंडीच्या दिवसांमध्ये उत्तम आरोग्यासाठी आहारही आरोग्यदायी असणं गरजेचं असतं. नाचणीचं सूप हा एक उत्तम पर्याय असून याची रेसिपी अगदी सोपी आहे.
1/7
आता पावसाळा संपून हिवाळा ऋतू सुरु झाला आहे. थंडीच्या दिवसांमध्ये उत्तम आरोग्यासाठी आहारही आरोग्यदायी असणं गरजेचं असतं.

advertisement
2/7
त्यामुळे आपण आपल्या घरीच आरोग्यदायी पदार्थ बनवू शकतो. यात नाचणीच्या पिठापासून मंचाव सूप हा एक उत्तम पर्याय आहे. आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी असणारं हे सूप कसं बनवायचं? याबाबत छत्रपती संभाजीनगर येथील आहारतज्ज्ञ डॉ. प्रज्ञा तल्हार यांनी माहिती दिलीये.

3/7
सूप बनवण्यासाठी साहित्य : नाचणीच्या पिठाचं सूप बनवण्यासाठी विविध भाज्यांचा वापर केला जातो. तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घेऊ शकता. यामध्ये गाजर, शिमला मिरची, कांद्याची पात, पत्ताकोबी, त्यासोबतच बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेली अद्रक आणि बारीक चिरलेली लसूण हे साहित्य आवश्यक आहे. तसेच सोया सॉस, काळी मिरची पावडर, टोमॅटो सॉस, तेल हेही आवश्यक आहे.

4/7
सूप बनवण्याची रेसिपी : तुम्ही हे सुप किती लोकांसाठी बनवणार आहात? त्यानुसार तुम्हाला प्रमाण ठरवायचं आहे. एक चमचा नाचणीच्या पिठासाठी तुम्हाला एक वाटी पाणी घ्यायचं आहे. सर्वप्रथम नाचणीचे पीठ हे छान भाजून घ्यायचं. हलकसं ब्राऊन होईपर्यंत पीठ भाजायचं.

5/7
त्यानंतर कढईमध्ये तेल घ्यायचं. त्या तेलामध्ये सुरुवातीला लसूण, अद्रक, हिरवी मिरची छान टाकून भाजून घ्यायचं. त्यानंतर सर्व चिरून घेतलेल्या भाज्या टाकायच्या. त्याही हळूहळू भाजून घ्यायच्या. भाज्या चांगल्या भाजल्या की त्याच्यामध्ये एक वाटी पाणी घालायचं आणि त्याला उकळी येऊ द्यायची.

6/7
भाजलेल्या पिठामध्ये थोडं पाणी घालून ते पीठ एकत्र छान मिक्स करून घ्यायचं. उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये हे पीठ घालायचं. त्यानंतर एका वाटीसाठी तुम्ही एक चमचा काळीमिरी पावडर, तसेच तुमच्या आवडीनुसार टोमॅटो सॉस आणि चवीनुसार मीठ घालायचं. त्याला एक छान उकळी येऊ द्यायची. त्यानंतर वरून त्याला गार्निशिंगसाठी कांद्याची पात टाकावी व जर तुमच्याकडे तळलेले नूडल्स असतील तर ते सुद्धा तुम्ही गार्निशिंगसाठी वापरू शकता.

7/7
अगदी घरच्या घरी तुम्ही नाचणीच्या पिठाचं पौष्टिक सूप बनवू शकता. त्यासाठी ही अगदी सोपी रेसिपी घरी नक्की ट्राय करा.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement