शरीरासाठी आरोग्यदायी नाचणीची आंबोळी, आता घरीच बनवा सोपी रेसिपी
- Published by:News18 Marathi
Last Updated:
शरीरासाठी अपायकारक नसलेला पौष्टिक असा हा पदार्थ असल्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण खात असतात.
advertisement
मुळात विविध घटकांनी युक्त नाचणी हे तृणधान्य शरीरासाठी अत्यंत पोषक घटक असल्यामुळे त्याच्यापासून बनवलेल्या आंबोळी या चविष्ट आणि पौष्टिक बनतात. त्यामुळेच कोल्हापूरच्या वैशाली भोसले यांनी नाचणीपासून आंबोळी कशा पद्धतीने बनवता येतात, याची पाककृती सांगितली आहे.
advertisement
advertisement
अशा मोड आलेल्या नाचणीच्या आंबोळी बनवण्यासाठी पहिल्यांदा नाचणी स्वच्छ धुऊन कापडात बांधून मोड काढून घ्यावी. तर पुढे ही मोड आलेली नाचणी पुन्हा एकदा धुवून उन्हात वाळवून घ्यावी. आणि वाळवलेल्या नाचणीचे पीठ तयार करताना त्यामध्ये थोडे मेथीचे दाणे आणि भाजलेले पोहे मिसळून नाचणीचे कोरडे पीठ तयार करून घ्यावे.
advertisement
advertisement
advertisement
दरम्यान नाचणी हे आपल्या शरीरासाठी एक आवश्यक तृणधान्य आहे. नाचणीमुळे तांदूळ आणि गहू यांच्यापेक्षा नाचणी हा एक आदर्श पर्याय मानला जातो. तर अनेक रोगांना प्रतिबंध करण्यासाठी देखील नाचणी प्रभावीपणे मदत करते. त्यामुळेच नाचणीपासून बनवलेल्या आंबोळी शरीरासाठी आरोग्यदायी ठरतात, असेही भोसले यांनी सांगितले आहे.