विदर्भ फेमस झणझणीत ओल्या तुरीचे कढीगोळे कसे करायचे? पाहा सोपी रेसिपी PHOTOS

Last Updated:
हिवाळा सुरू झाला आणि ओल्या तुरीचे दाणे बाजारात आले की, विदर्भात आवर्जून बनवला जाणारा पदार्थ म्हणजे ओल्या तुरीच्या दाण्याचे कढीगोळे. हा पदार्थ बनवायला थोडा वेळ घेतो. पण खायला एकदम चविष्ट लागतो. 
1/8

advertisement
2/8
बाहेरून आलेल्या अनेक लोकांची मागणी असते की, पाहुणचार करत आहात तर कढीगोळे आणि भाकरीचाच पाहुणचार करा. इतका टेस्टी हा पदार्थ लागतो. विदर्भात असे क्वचित लोकं असतील ज्यांना हा पदार्थ आवडत नसेल. चला तर जाणून घेऊ झणझणीत आणि टेस्टी असे ओल्या तुरीच्या दाण्याचे कढीगोळे कसे बनवायचे?

3/8
तुरीच्या दाण्याचे कढीगोळे बनवण्यासाठी लागणारे साहित्य : तुरीचे दाणे, हिरवी मिरची, कोथिंबीर, कडी पत्ता, जिरे, मोहरी, हळद, मीठ, लसूण पेस्ट, डाळीचे पीठ, ताक हे साहित्य लागेल.

4/8
 कृती :- सर्वात आधी तुरीचे दाणे आणि हिरवी मिरची व्यवस्थित मिक्सर मधून बारीक करून घ्यायची. तुम्ही हे दाणे आणि मिरची पाट्यावर सुद्धा वाटून घेऊ शकता. त्याची चव आणखी छान लागते.त्यानंतर कढी बनवायला घ्यायची.

5/8
 कढी बनवण्यासाठी सर्वात आधी ताकामध्ये डाळीचे पीठ टाकून ते मिक्स करून घ्यायचे आहे. डाळीचे पीठ एकदम टाकायचे नाही. त्यामुळे कढीचा स्वाद बदलतो. अर्धा लिटर ताक असेल तर 1 टीस्पून डाळीचे पीठ तुम्ही टाकू शकता. त्यानंतर त्यात हळद टाकून घ्यायची. त्यानंतर मीठ टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित रवी ने हे ताक फिरवून घ्यायचे आहे.

6/8
 त्यानंतर गॅसवर कढई ठेवून त्यात तेल घालून ते थोडे गरम होऊ द्यायचे. तेल गरम झाले की, त्यात जिरे टाकून घ्यायचे. त्यानंतर मोहरी आणि हिरवी मिरची. हे थोड शिजू द्यायचं आहे. त्यानंतर त्यात कडी पत्ता टाकायचा आहे. त्यानंतर लसूण पेस्ट टाकायची आणि ती परतून घ्यायची. त्यानंतर त्यात ताक टाकायचे आणि कढीला उकळी येऊ द्यायची आहे.

7/8
कढीला उकळी येतपर्यंत गोळे बनवून घ्यायचे. त्यासाठी सारण त्यार करून घ्यायचे आहे. त्यासाठी तुरीच्या दाण्याचा पेस्ट मध्ये मीठ, डाळीचे पीठ, हळद, लसूण पेस्ट, जिरे, कोथिंबीर, कडीपत्ता हे सर्व साहित्य टाकून ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. त्यात लागत असल्यास आणखी डाळीचे पिठ टाकून त्याचा थोडा घट्टसर गोळा तयार होईल असे सारण तयार करून घ्यायचे आहे. तो पर्यंत कढीला उकळी आलेली असेल.

8/8
आता त्यात छोटे छोटे गोळे बनवून कढीमध्ये टाकून घ्यायचे आहे. गोळे अगदी सहज बनतात. पूर्ण गोळे एका वेळी तयार करून घ्यायचे नाही. कढीला उकळी आली की एक एक बनवून कढीमध्ये टाकायचे आहे. त्यानंतर जो पर्यंत गोळे वर येत नाही तो पर्यंत कढी मध्ये चमचा टाकायचा नाही. त्यामुळे गोळे फुटतात. त्यानंतर गोळे जेव्हा कढीच्या वर यायला लागतात तेव्हा समजायचं की गोळे तयार आहेत. त्यानंतर त्यावर कोथिंबीर घालून घ्यायची. कढी गोळे खाण्यासाठी तयार होतात. हे कढीगोळे तुम्ही भाकरी सोबत खाऊ शकता.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement