Idli : जाळीदार इडली कशी बनवायची? सोपं आहे, फक्त 'या' 10 गोष्टी लक्षात ठेवा, हॉटेलसारखी बनेल इडली
- Published by:Devika Shinde
Last Updated:
तुमची इडली परफेक्ट आणि जाळीदार व्हावी यासाठी स्वयंपाकघरातील काही सोप्या आणि वैज्ञानिक टिप्सचा वापर करणे आवश्यक आहे. जाणून घ्या, तुमची इडली परफेक्ट जाळीदार होण्यासाठीच्या 10 खास आणि महत्त्वाच्या टिप्स
दक्षिण भारतीय पदार्थांमध्ये इडलीचे स्थान खूप वरचे आहे. हलकी, पचायला सोपी आणि पौष्टिक असल्यामुळे इडली हा अनेकांच्या नाश्त्यामधील महत्वाचा भाग आहे. लोक अगदी नाश्त्यापासून ते जेवणापर्यंत कोणत्याही वेळेस इडली खाऊ शकतात. फक्त इडली पांढरी शुभ्र आणि मऊ असायला पाहिजे, म्हणजे ती खाण्याची मज्जा काही औरच असते. मऊ लुसलुशीत गरम गरम इडली पोटात गेली की मन आणि पोट दोन्ही भरतं.
advertisement
इडली बनवायला सोपी असली तरी, अनेकांना ती मऊ, शुभ्र आणि मुख्य म्हणजे जाळीदार बनवण्यात अडचणी येतात. हॉटेलमध्ये मिळते तशी जाळीदार इडली घरी बनवणे हे एक मोठे आव्हान वाटते. तुमची इडली परफेक्ट आणि जाळीदार व्हावी यासाठी स्वयंपाकघरातील काही सोप्या आणि वैज्ञानिक टिप्सचा वापर करणे आवश्यक आहे. जाणून घ्या, तुमची इडली परफेक्ट जाळीदार होण्यासाठीच्या 10 खास आणि महत्त्वाच्या टिप्स.
advertisement
1. तांदूळ आणि डाळीचे योग्य प्रमाणइडलीसाठी तांदूळ आणि उडीद डाळीचे प्रमाण 3:1 (म्हणजे 3 वाट्या तांदूळ आणि 1 वाटी उडीद डाळ) ठेवा. परफेक्ट जाळीदार इडलीसाठी हे प्रमाण अत्यंत महत्त्वाचे आहे.2. मेथी दाण्यांचा वापरतांदूळ आणि डाळीसोबत एक चमचा मेथीचे दाणे (Fenugreek Seeds) भिजत घाला. मेथीमुळे पीठ आंबवण्याची (Fermentation) प्रक्रिया सुधारते आणि इडलीला उत्तम चव येते.
advertisement
3. भिजवण्याची वेळतांदूळ आणि डाळ कमीतकमी 4 ते 6 तास भिजवणे आवश्यक आहे, जेणेकरून ते बारीक करताना मऊ होतील.4. बारीक करण्याची पद्धत (Grinding)डाळ वेगळी आणि तांदूळ वेगळे बारीक करा. डाळ बारीक करताना अगदी कमी पाण्याचा वापर करा आणि ती जास्त वेळ (बारीक आणि हलकी होईपर्यंत) बारीक करा. तांदूळ थोडेसे भरड (रवाळ) ठेवा.
advertisement
5. गरम पाण्याचा वापर टाळापीठ बारीक करण्यासाठी नेहमी थंड पाण्याचा (किंवा बर्फाच्या पाण्याचा) वापर करा. मिक्सरमध्ये उष्णता निर्माण होते. जास्त उष्णतेमुळे डाळीतील प्रथिने (Proteins) खराब होतात, ज्यामुळे आंबवण्याची प्रक्रिया नीट होत नाही.6. आंबवण्यासाठीचे तापमानपीठ आंबवण्यासाठी उष्ण आणि दमट वातावरण आवश्यक आहे. पीठ किमान 8 ते 12 तास उबदार जागी ठेवा. थंडीच्या दिवसात ओव्हनमध्ये (बंद) किंवा मायक्रोवेव्हमध्ये (बंद) बल्ब लावून ठेवा.
advertisement
advertisement
9. इडली पात्राची तयारीइडली पात्रातील साच्यांना हलके तेल किंवा तूप लावून घ्या आणि इडलीची बॅटर साच्यात भरण्यापूर्वी एकदा हलके मिक्स करा.10. पाण्याची वाफइडली नेहमी उच्च वाफेवर शिजवा. इडली स्टँड भांड्यात ठेवण्यापूर्वी पाणी चांगले उकळलेले असावे. साधारणपणे 10 ते 15 मिनिटे वाफवल्यास इडली परफेक्ट तयार होते. ती लगेच साच्यामधून काढण्याची घाई करु नका. 2/4 मिनिटांनी इडली काढली तर त्याचा शेप चांगला रहातो आणि ती चिकटत देखील नाही.या सोप्या टिप्सचा वापर करून तुम्हीही हॉटेलसारखी मऊ, शुभ्र आणि जाळीदार इडली घरी बनवू शकतात
advertisement








