पावसाळ्यातच येते ही खास भाजी, तुम्ही कधी रेसिपी ट्राय केली का? PHOTOS

Last Updated:
अनेक दुर्मिळ रानभाज्या शेतात किंवा परिसरात उगवत असतात. यापैकीच एक म्हणजेच झेटूनीची फुले होय.
1/6
बाजारात मिळणाऱ्या नेहमीच्या पालेभाज्या आपण नेहमीच खात असतो. मात्र काही रानभाज्या या विशिष्ट दिवसांमध्येच येत असतात. पावसाळा या अशा रानभाज्या उगवण्यासाठी अतिशय योग्य असा काळ असतो. याच काळात अनेक दुर्मिळ रानभाज्या शेतात किंवा परिसरात उगवत असतात. यापैकीच एक म्हणजेच झेटूनीची फुले होय.

advertisement
2/6
अतिशय दुर्गम भागात काटेरी झुडूप यांचेवर हा वेल पसरलेला असतो. या वेलीवर छोटे छोटे फुलांची गुच्छ असतात. ही फुले काढून त्याची अतिशय चवदार अशी भाजी बनवली जाते. पावसाळ्यातील केवळ 15 ते 20 दिवसच ही फुले उपलब्ध असतात.

3/6
पाऊस पडल्यानंतर 21 दिवसांनी या वेलींना बहर येतो आणि त्यावर ही फुले लागतात. या फुलांना वेगवेगळ्या भागात वेगवेगळी नावे आहेत. अतिशय दुर्मिळ असल्याने सहसा ही फुले बाजारात उपलब्ध होत नाहीत.

4/6
रान माळवरून फुले तोडून आणल्यानंतर फुलांना आधी स्वच्छ केलं जातं. त्यांनतर स्वच्छ पाण्याने धुवून घेतले जाते. अतिशय बारीक कापलेला कांदा, तिखट मीठ आणि तेल एवढ्या कमी साहित्यात चवदार चटणी या फुलांपासून तयार केली जाते. तव्यावर तेल गरम केल्यानंतर त्यावर बारीक चिरलेला कांदा घातला जातो.

5/6
कांदा तपकिरी रंग येईपर्यंत परतून घेतल्यानंतर त्यावर मिरची पूड आणि चवीनुसार मिठ घातले जाते. हे सर्व चांगले परतून घेतल्यानंतर स्वच्छ केलेली फुले तव्यावर टाकून त्यांना देखील व्यवस्थित परतून घ्यावं. सगळे मिश्रण एकजीव झाल्यानंतर थोड्यावेळाने गॅस वरून उतरवून घ्यावे, अशा पद्धतीने चवदार झेटूनीच्या फुलांची भाजी तयार होते.

6/6
पावसाळ्यात दरवर्षी पाऊस झाल्यानंतर 20 ते 22 दिवसांनी ही फुले काटेरी झुडपांवर येतात. ही फुलं घरी आणून याची चटणी आम्ही दरवर्षी खात असतो. अतिशय चवदार चटणी या फुलांपासून बनते. याला बनवण्यासाठी फार जास्त साहित्य देखील लागत नाही. तेल मीठ आणि तिखट असेल अतिशय चवदार भाजी झेटूनीच्या फुलापासून तयार होते.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement