Summer Tips : फ्रिज नसल्याने टोमॅटो लवकर खराब होतात? पाहा फ्रिजशिवाय टोमॅटो कसे साठवावे..
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
टोमॅटो बहुतेकदा थंड तापमानात सुरक्षित असतात. विशेषतः उन्हाळा आणि पावसाळ्यात टोमॅटो बाहेर ठेवल्याने ते लवकर खराब होऊ लागतात. अशावेळी लोक टोमॅटो फ्रीजमध्ये ठेवण्यास प्राधान्य देतात. परंतु काही जणांकडे फ्रिज नसल्याने त्यांना टोमॅटो साठवणे कठीण जाते. पण काळजी करू नका. काही सोप्या टिप्स फॉलो करून तुम्ही टोमॅटो खराब होण्यापासून वाचवू शकता. चला तर मग जाणून घेऊया फ्रीजशिवाय टोमॅटो साठवण्याच्या काही टिप्स.
advertisement
advertisement
प्लास्टिक कंटेनर वापरा : बरेचदा लोक टोमॅटो साठवण्यासाठी स्वयंपाकघरात ठेवतात. स्वयंपाकघरातील उष्णतेमुळे टोमॅटो लवकर खराब होऊ लागतात. त्यामुळे टोमॅटो साठवण्यासाठी तुम्ही प्लास्टिकच्या कंटेनरचा वापर करू शकता. यासाठी टोमॅटो चांगले कोरडे करून, ज्यात हवा खेळती राहील अशा प्लास्टिकच्या डब्यात भरून घरातील थंड ठिकाणी ठेवा. यामुळे टोमॅटो लवकर खराब होणार नाहीत.
advertisement
मातीची मदत घ्या : टोमॅटो साठवण्यासाठी मातीचाही उत्तम वापर केला जाऊ शकतो. टोमॅटो जमिनीत ठेवल्याने बरेच दिवस ताजे राहतात. यासाठी स्वच्छ कंटेनर धुवा आणि वाळवा. आता त्यात माती भरा आणि या मातीत टोमॅटो गाडून टाका. पण लक्षात ठेवा की टोमॅटोमध्ये पाणी नसावे. तसेच टोमॅटो स्वच्छ आणि कोरड्या हातांनी बाहेर काढा.
advertisement