Summer Tips : उन्हाळ्यात मॉर्निंग वॉक करण्याचे 'हे' आहे परफेक्ट ड्युरेशन; वेळ पाळा, 43% आजार राहतील दूर
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
मॉर्निंग वॉक करणं प्रत्येक ऋतूत आपल्यासाठी फायदेशीर असतं, हे सर्वांना माहित आहेच. म्हणून लोक प्रत्येक ऋतूमध्ये हा व्यायाम करतात. साधारणपणे आपल्या शरीराची जशी क्षमता असेल, तितके आपण रोज चालू शकतो. पण काहीवेळा प्रश्न पडतो की, कोणत्या ऋतूमध्ये किती वेळ चालल्याने आपल्याला जास्त फायदा होईल? आज याच प्रश्नाचे उत्तर आपण जाणून घेणार आहोत. चला पाहूया उन्हाळ्यात किती वेळ चालणं फायदेशीर असतं.
advertisement
तज्ज्ञांच्या मते, दररोज मॉर्निंग वॉक केल्याने लोकांची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होऊ शकते. तुम्ही तणाव किंवा चिंतेचा सामना करत असाल तर मॉर्निंग वॉकमुळे आराम मिळतो. दिवसभर सकारात्मक आणि आनंदी राहण्यासाठी सकाळी नक्कीच फिरायला हवे. सकाळी उठणे आणि फिरायला जाणे तुमच्या मानसिक आरोग्यासाठी खूप चांगले आहे.
advertisement
advertisement
मॉर्निंग वॉक केल्याने तुमचा दिवस चांगल्या मूडने सुरू होतो आणि संपतो. सर्व वयोगटातील लोक त्यांच्या क्षमतेनुसार मॉर्निंग वॉक करू शकतात. रोज मॉर्निंग वॉक घेतल्याने फ्लूचा संसर्ग होण्याचा धोका कमी होतो. अभ्यासात दिसले आहे की, जे लोक दिवसातून किमान 20 वेळा, आठवड्यातून 5 दिवस चालतात, त्यांचा आजारी पडण्याचा धोका 43% कमी होतो.
advertisement
advertisement
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, नियमित मॉर्निंग वॉकमुळे हृदयविकार, स्ट्रोक, मधुमेह आणि काही प्रकारच्या कर्करोगाचा धोका कमी होतो. उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या रुग्णाने चालण्याने रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते. मॉर्निंग वॉक हृदयासाठीही फायदेशीर असतो. गुडघे आणि स्नायूंसाठी देखील हे फायदेशीर आहे. मॉर्निंग वॉकचे असंख्य फायदे आहेत, जे तुम्हाला फक्त 20-30 मिनिटांच्या चालण्याने मिळू शकतात.










