पुरेपूर कोल्हापूर! नववर्षाच्या स्वागतासाठी ‘या’ 10 ठिकाणी द्या भेट; नक्की आवडतील PHOTOS

Last Updated:
नववर्षारंभ साजरा करण्याबरोबरच वर्षभरात केव्हाही या ठिकाणी भेट देऊ शकतो.
1/11
 वर्षाअखेर आणि नवीन वर्षाचे स्वागत करतेवेळी<a href="https://news18marathi.com/maharashtra/kolhapur/"> कोल्हापुरात</a> भेट देण्यासाठी विविध ठिकाणं आहेत. आपण नववर्षारंभ साजरा करण्याबरोबरच वर्षभरात केव्हाही या ठिकाणी भेट देऊ शकतो.

advertisement
2/11
कोल्हापुरातील करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात देवीचे दर्शन घेऊन नवीन वर्षाची पवित्र सुरुवात करण्यासाठी उत्तम पर्याय आहे. डिसेंबर महिन्यातील सुट्ट्यांचा फायदा घेत बरेच जण येणारे नववर्ष देवीच्या आशीर्वादाने चांगले जाण्याची प्रार्थना देवीकडे करत असतात.

3/11
 कोल्हापूरचे मरीन ड्राइव्ह असणाऱ्या रंकाळा तलावाला भेट देणे ही देखील पर्यटकांच्या यादीतील महत्त्वाची गोष्ट असते. या तलावाचा सुंदर असा नजारा, बाजूने बगीचा आणि सेलिब्रेशनसाठी विविध गोष्टी या ठिकाणी मिळून जातात.

4/11
 कोल्हापूर शहरातच असणारे टाऊन हॉल वस्तुसंग्रहालयाला भेट देऊन आपण कोल्हापूरची ऐतिहासिक पार्श्वभूमी जाणून घेऊ शकतो. याठिकाणी कोल्हापूरचा जवळपास अडीच हजार वर्षांपूर्वीच्या इतिहास पाहता येतात.

5/11
कोल्हापूरच्या छत्रपतींचे निवासस्थान अर्थात न्यू पॅलेस मध्येही एक संग्रहालय आहे. या राजवाड्याच्या आतील बाजुस लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या वस्तु संग्रालयात पाहायला मिळतात.

6/11
 कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकापासून अगदी जवळच टेकडीवर टेंबलाई देवीचे मंदिर आहे. शहराच्या अगदी जवळच असणाऱ्या शांत अशा ठिकाणी टेंबलाई किंवा त्र्यंबोली देवीचे आणि मरगाई देवीचेही मंदिर आहे.

7/11
कोल्हापूर शहरातून श्री क्षेत्र जोतिबाला जाताना वडणगे-कुशिरे मार्गाने जाताना पोहाळे येथील बुद्धकालीन लेणी पाहायला मिळतात. रस्त्यालगत थोड्या आतल्या बाजूला चालत गेल्यानंतर डोंगराच्या कुशीत ही लेणी निदर्शनास पडतात.

8/11
पुणे-बेंगलोर महामार्गावरून टोप गावाजवळ एक उंचच उंच गणेशमूर्ती दिसते. चिन्मय मिशनने कर्नाटकातून 50 कारागीरांकडून 18 महीन्यांत ही मूर्ती बनवून घेतली आहे. 24 फूट उंचीच्या ध्यानगृहावर ही 61 फूट उंच अशी बैठी गणेशमूर्ती आहे.

9/11
 आंदुर डॅम हा कोल्हापूर पासून 47 किमी लांब असणारा पण एक चांगला पिकनिक स्पॉट ठरू शकतो. फॅमिली सोबत फिरायला गेल्यास या ठिकाणी अगदी कमी किंमतीत जेवणाची सोयही होऊ शकते.

10/11
 कोल्हापूर शहरापासून साधारण 60 किमी लांब असणारा गगनबावडा तालुक्यात गगनगिरी महाराजांचा मठ देखील उत्तम पर्याय आहे. या ठिकाणाहून दिसणारे निसर्गसौंदर्य डोळ्यांचे पारणे फेडणारे असते.

11/11
रामतीर्थ हे ठिकाण आजरा तालुक्यापासून फक्त 2 किमी अंतरावर आहे. नैसर्गसौंदर्याची मुक्त उधळण या ठिकाणी पाहावयास मिळते. हिरण्यकेशी नदीचा प्रवाहातून निर्माण झालेला धबधबा आणि अनेक प्राचीन मंदिरं या ठिकाणी आहेत. पर्यटकांना इथे राहण्याची सोयही होऊ शकते.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement