ठाण्यात हे नाही पाहिलं तर पाहिलं काय? मुंबईच्या जवळची 5 फेमस पर्यटनाची ठिकाणं

Last Updated:
Thane Tourism: मुंबईपासून अगदी जवळ असणाऱ्या ठाणे जिल्ह्यात अनेक प्रसिद्ध पर्यटनस्थळं आहेत. पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र असणाऱ्या 5 पर्यटनस्थळांबाबत जाणून घेऊ.
1/7
ठाणे जिल्हा मुंबईच्या अगदी जवळ असून, सुंदर पर्यटन स्थळांसाठी प्रसिद्ध आहे. तलावांचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाण्यात अनेक ऐतिहासिक मंदिरे, किल्ले, हिरवीगार उद्याने आणि डोंगररांगा आहेत. 

advertisement
2/7

3/7
येऊर हिल्स : तुम्ही येऊर हिल्सवर ट्रेकिंग करू शकता. हा परिसर खूप शांत आणि निसर्गरम्य आहे. येथे आल्यावर तुम्हाला सुंदर पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला मिळेल आणि ताजी हवा अनुभवता येईल. येऊर हिल्स ठाण्यापासून फक्त 7 किमी अंतरावर आहे. तुम्ही बस, ऑटो किंवा स्वतःच्या वाहनाने सहज येथे पोहोचू शकता.

4/7
उपवन तलाव : उपवन तलाव हा ठाण्यातील सर्वात सुंदर आणि रोमँटिक तलाव मानला जातो. या तलावाभोवती हिरवीगार झाडं आणि शांत पाणी आहे, जे मनाला प्रसन्न करतं. हा तलाव येऊर पर्वताच्या पायथ्याशी असल्यामुळे इथून तुम्हाला डोंगराचं अप्रतिम दृश्य दिसतं. जर तुम्हाला निसर्गाच्या सान्निध्यात शांत वेळ घालवायचा असेल किंवा संध्याकाळी फिरायला जायचं असेल, तर उपवन तलाव हे एक उत्तम ठिकाण आहे.

5/7
द वॉक हिरानंदानी एस्टेट : हे भारतातील पहिलं टेकडीवरचं निवासी ठिकाण आहे. इथे तुम्हाला दोन्ही बाजूंनी कॅफे, रेस्टॉरंट, सुपरमार्केट आणि अनेक दुकाने दिसतील. तुम्हाला ओपन एअर शॉपिंगचा आणि मॉलसारख्या वातावरणाचा आनंद घ्यायचा असेल, तर ‘द वॉक’ हे योग्य ठिकाण आहे.

6/7
गायमुख चौपाटी : गायमुख चौपाटी ही ठाण्याच्या घोडबंदर रोडवरील एक सुंदर जागा आहे. येथे येऊन तुम्ही थंड वाऱ्याचा आणि शांत समुद्राच्या लाटांचा आनंद घेऊ शकता. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि आजूबाजूच्या हिरवळीमुळे हे ठिकाण आणखी सुंदर दिसतं.

7/7
जगन्नाथ महादेव मंदिर : गायमुख चौपाटीच्या समोर डोंगरावर हे सुंदर मंदिर आहे. अनेक पर्यटक आणि भाविक इथे दर्शनासाठी येतात. या मंदिराजवळून सुंदर निसर्ग दृश्य दिसतं, त्यामुळे येथे आल्यावर तुम्हाला मनःशांती मिळेल.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement