Summer Tour: उन्हाळ्याच्या सुट्टीत गजानन महाराजांच्या दर्शनाला जाताय? ही 5 बेस्ट ठिकाणं पाहाच!

Last Updated:
Summer Tour: उन्हाळ्याच्या सुट्टीत एखाद्या पर्यटनस्थळी फिरायचला जाण्याचं अनेकांचं नियोजन असतं. विदर्भातील श्री क्षेत्र शेगाव आणि जवळच्या 5 प्रसिद्ध पर्यटनस्थळांना भेट देऊ शकता.
1/7
उन्हाळ्याच्या सुट्टीत अनेकांचा फिरायला जाण्याचा प्लॅन असतो. परंतु, विदर्भातील रखरखत्या उन्हात फिरणं अनेकांना नकोसं होतं. अशा काळात अनेकजण बुलढाण्यातील श्री क्षेत्र शेगावचं गजानन महाराज मंदिराला भेट देतात. तेव्हा इथं जवळच असणारी 5 प्रसिद्ध पर्यटनस्थळं देखील तुम्ही पाहू शकता. याबाबतच आपण लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.

advertisement
2/7
श्री संत गजानन महाराजांचे मंदिर: बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे श्री संत गजानन महाराजांचे भव्य असे मंदिर आहे. विदर्भातील सर्वात भव्य आणि आकर्षक मंदिर म्हणून या मंदिराची ओळख आहे. राहण्याची व्यवस्था, जेवण सर्व काही इथे मनासारखं मिळतं. राहण्यासाठी भक्त निवास असल्याने कमीत कमी खर्चात तुमची राहण्याची व्यवस्था होते.

3/7
कृष्णाजीचा मळा: मंदिराच्या मागच्या बाजूला काही अंतरावर कृष्णाजीचा मळा हे ठिकाण आहे. इथं अतिशय शांत वातावरण असतं. या ठिकाणी महाराजांनी जळत्या पलंगावर बसून चमत्कार दाखविला. तसेच ब्रम्हगिरीचे गर्व हरण करून त्याला प्रचिती दिली असल्याची आख्यायिका आहे. त्याच परिसरात शिव मंदिर सुद्धा आहे. इथे एक वटवृक्ष असून त्याखाली महाराज नेहमी बसत असल्याचं सांगितलं जातं.

4/7
महालक्ष्मी मंदिर: बाळापूर रोडवर महालक्ष्मी मंदिर आहे. हे मंदिर आणि मंदिरातील देवीची मूर्ती अत्यंत आकर्षक आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करताच अतिशय प्रसन्न वातावरण याठिकाणी बघायला मिळते. नवनवीन दुकानं सुद्धा त्या मंदिराच्या परिसरात आहेत. त्याचबरोबर विदर्भातील फेमस गांधी ग्रामची गुळपट्टी सुद्धा मिळते.

5/7
आर्ट गॅलरी: श्री संत गजानन महाराज मतिमंद विद्यालय देखील महालक्ष्मी मंदिराच्या परिसरात आहे. तेथील बौद्धिक दिव्यांग असलेल्या मुलांनी स्वतःच्या हाताने नवनवीन वस्तू बनवलेल्या आहेत. त्या वस्तूंची आर्ट गॅलरी या ठिकाणी तयार केलेली आहे. त्यामध्ये टेराकोटा मातीपासून बनवलेल्या वस्तू, नवनवीन फ्रेम आपल्याला तिथे बघायला मिळतात.

6/7
माऊली वॉटर पार्क: देवदर्शन झाल्यानंतर तुम्ही माऊली वॉटरपार्क येथे जाऊ शकता. हे वॉटर पार्क खामगाव रोडवर आहे. येथील तिकीट ही 700 ते 800 रुपये प्रति व्यक्ती अशी असल्याची माहिती मिळते. याठिकाणी तुम्हाला 6 प्रकारच्या ॲक्टिव्हिटी, कॅफेटेरिया, चेंजिंग रूम, ब्लॉकर्स या सर्व सुविधा उपलब्ध आहेत. आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी हे बेस्ट ऑप्शन असू शकतं.

7/7
दरम्यान, शेगावला गेल्यानंतर देवदर्शनासोबत पर्यटानाचा देखील आनंद घेऊ शकता. विशेष म्हणजे इथं अत्यंत कमी खर्चात तुमची संस्मरणीय ट्रिप होऊ शकते.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement