Wall squats benefits: वजन कमी करायचं आहे पण होत नाही; घरच्या घरी करा ‘हा’ 2 मिनिटांचा व्यायाम, फक्त वजनच नाही ब्लडप्रेशरही होईल कमी
- Published by:Tushar Shete
Last Updated:
Health benefits of wall squats in Marathi: वजन कमी करण्यासाठी अनेकांना अनेक उपाय करावे लागतात. काही उपाय खर्चिक डाएटचे असतात तर काही व्यायामाचे. हे दोन्ही अनेकांना जमत नाहीत. अनेकजण जीममध्ये वर्कआऊट करण्यासाठी हजारो रूपये खर्च करतात. मात्र जीमला जायला वेळ न मिळल्याने त्यांचे पैसे फुकट जातात. तुम्हालाही जर वजन कमी करायचं असेल तर आम्ही सांगतो तो व्यायाम तुम्ही करा. अवघ्या 2 मिनिटाचा हा व्यायाम केल्याने तुम्ही अगदी घरबसल्या तुमचं वजन अगदी आठवडा भरात कमी करू शकता.
advertisement
advertisement
advertisement
हा व्यायाम करताना तुम्ही तुमचे हात जमिनीला समांतर किंवा तुमच्या मांड्यावर ठेवू शकता. पायांवर आणि पोटावर येणारा दबाव सहन झाल्यानंतर पुन्हा मूळ स्थितीत या. सुरूवातीला 2 ते 3 वेळा वॉल स्क्वॅट्स करून तुम्ही हा व्यायाम 4 ते 5 मिनिटांपर्यंत वाढवू शकता. तुम्ही एक्सपर्ट असाल तर पायात बँड घालूनही हा व्यायाम करू शकता.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
धावणे, दोरी उड्या मारणे किंवा वजन कमी करण्यासाठी उड्या मारण्याचे विविध व्यायाम करणे यासाठी वॉल स्क्वॅट्स एक उत्तम पर्याय ठरू शकतो. उड्या मारल्यामुळे किंना धावल्यामुळे पायांचे स्नायू आणि सांध्यावर ताण येऊ शकतो. कधी-कधी दुखापतीची सुद्धा भीती असते. मात्र वॉल स्क्वॅट्समुळे हा स्थिर व्यायाम असल्यामुळे दुखापतीचा धोका कमी असतो.