मराठवाड्यात हुडहुडी, 2 जिल्ह्यांत तापमान 8 अंश सेल्सिअस, हवामान विभागाने दिला अलर्ट
- Published by:Mohan Najan
- Reported by:Prashant Pawar
Last Updated:
Marathwada Weather Update: मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे. दिवसा सूर्यप्रकाश तर रात्री थंडीचे प्रमाण वाढले आहे.
advertisement
छत्रपती संभाजीनगर आणि जालना या दोन्ही जिल्ह्यांमध्ये दिवसभर सूर्यप्रकाश जाणवेल. कमाल तापमान अनुक्रमे 27 अंश सेल्सिअस आणि 28 अंश सेल्सिअस राहील. रात्रीच्या वेळी किमान तापमान 10 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल. दोन्ही जिल्ह्यांत थोडासा गारठा अधिक जाणवेल. त्यामुळे नागरिकांनी रात्री उबदार कपड्यांचा वापर करावा.
advertisement
लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांत दिवसभर सौम्य सूर्यप्रकाश अनुभवता येईल. कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस ते 29 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. रात्री मात्र तापमान कमी होऊन 11 अंश सेल्सिअस आणि 13 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. या भागांतील शेतकऱ्यांसाठी हे हवामान रब्बी हंगामातील पीकवाढीसाठी अनुकूल ठरेल.
advertisement
advertisement